पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक २०१८ चा उपविजेता संघ क्रोएशियाने २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी (FIFA WC 2022) लुका मॉड्रिक, इव्हान पेरिसिक आणि मार्सेलो ब्रोजोविच या अनुभवी खेळाडूंना प्राध्यान्य देत संघात कायम ठेवले आहे. क्रोएशियाचे प्रशिक्षक डालिक यांनी बुधवारी (दि. ९) फुटबॉल विश्वचषकासाठी २६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
कतार येथे होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी बेल्जियम, कॅनडा आणि मोरोक्कोसह क्रोएशियाला एफ गटात स्थान देण्यात आले आहे. विश्वचषकाचा पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात २० नोव्हेंबर रोजी दोहा येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. (FIFA WC 2022)
गोलकीपर : डोमिनिक लिव्हाकोविक, इविका इव्हुसिक, इव्हो ग्रबिक
डिफेंडर : डोमागोज विडा, देजान लोवरेन, बोर्ना बॅरिसिक, जोसिप जुरानोविक, जोस्को ग्वार्डिओल, बोर्ना सोसा, जोसिप स्टॅनिसिक, मार्टिन एर्लिक, जोसिप सुतालो
मिडफिल्डर : लुका मॉड्रिक, माटेओ कोव्हासिक, मार्सेलो ब्रोझोविक, मारियो पासालिक, निकोला व्लासिक, लोवरो मेजर, क्रिस्टीजन जॅकिक, लुका सुसिक
फॉरवर्ड्स : इव्हान पेरिसिक, आंद्रेज क्रॅमरिक, ब्रुनो पेटकोविक, मिस्लाव ओरसिक, अँटे बुदिमिर, मार्को लिवाजा
हेही वाचा;