Latest

FFV-SHEV Corolla Altis : देशातील ‘ही’ पहिली कार, जी चालते १०० टक्के इथॅनॉलवर : नितीन गडकरी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या गाड्यांचा वापर यामुळे वाढते दर आणि प्रदुषण लोकांना त्रासदायक ठरत आहे. या परस्थितीचे गांभिर्य ओळखून परंपरागत वापरल्या जाणाऱ्या गाड्यांना सरकारने सध्या पर्याय शोधला आहे. केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी आज (दि. ११) देशातील पहीली फ्लेक्स फ्यूल ( एकापेक्षा जास्त इंधनावर चालणारी) असणारी FFV-SHEV Corolla Altis ही कार लाँच केली आहे.

केंद्रिय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फ्लेक्स फ्यूल ही देशातील पहिली कार लाँच करण्यात आली आहे. ही कार १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणारी असेल. पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही फ्लेक्स फ्यूल हायब्रिड ईलेक्ट्रीक कार (FFV-SHEVs) भारतात लाँच झाली आहे. प्रदुषण रोखणे हे मुख्य उद्दिष्ट्य या पायलट प्रोजेक्टचे आहे. कारण फ्लेक्स फ्यूलवरवर आधारित इंजिन हे इथॅनॉल आणि मिथॅनॉल या जैव इंधनावर चालणारे असेल. या जैवइंधनामुळे प्रदुषण रोखण्यास मदत होईल. टोयोटा कंपनीने लाँच केलेली FFV hybrid Corolla Altis ही कार दिल्ली येथे आज करण्यात आली.

फ्लेक्स (Flex) इंधन म्हणजे काय?

फ्लेक्स-इंधन हा एक प्रकारे पेट्रोल-डिझेलला पर्याय आहे. त्यामुळे त्याला पर्यायी इंधन असे म्हणतात. हे गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलच्या मिश्रणापासून हे तयार केले जाते. फ्लेक्स हा  शब्द इंग्रजी flexible शब्दापासून आला आहे. फ्लेक्स इंजिन म्हणजे जे इतर इंधनांवर कोणत्याही अडचणीशिवाय चालू शकते.

FFV-SHEV आणि Flex-Fuel

फ्लेक्सी इंजिनाच्या गाड्यांची खासियतह ही आहे की, या गाड्या इंधनाच्या वेगवेगळ्या प्रकारात किंवा पेट्रोलसह इथॅनॉल किंवा मिथॅनॉल वर धावू शकतात.  कारण FFV-SHEV या गाड्या 100 टक्के इथेनॉलवर धावू शकतात. तसेच हायब्रीड-इलेक्ट्रिक ड्राईव्हट्रेनचा पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास देखी फायदा होतो. त्यामुळे FFV-SHEV Corolla Altis ही नवी कार Flexi पेक्षाही एक पाऊल पुढे आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT