फीचर्स

अंध बांधवांचा डोळस कलाविष्कार

backup backup

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा द़ृष्टिहीन म्हणून वावरताना येणार्‍या संकटांचा सामना करत विविध कलाविष्कारात मिळवलेले प्रावीण्य हे कौतुकास्पद आहे. अंध बांधवांच्या अंगी असलेल्या कर्तृत्वावर त्यांचा समाजात स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. आयुष्य सुखकर, आनंदी करतानाच हार न मानता लढत रहा यश निश्चितच तुमचे असेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन व नॅशनल असो. फॉर द ब्लाईंड संस्थेच्या वतीने अंध बांधवांच्या गायन-वादन स्पर्धेच्या बक्षीस समारंभात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मृती शताब्दीनिमित्त बुधवारी (दि. 1) रामभाई सामानी हॉल, उद्यमनगर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वर्षा चौगुले, डॉ. मुरलीधर डोंगरे, कमलाकांत कुलकर्णी, प्रशांत पाटील, सुनील नागराळे, केरबा हंडे उपस्थित होते. अंध बांधवांच्या खुला आणि शालेय अशा दोन गटांत गायन- वादनाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांच्यावर नियतीने लिहिलेला अंधार दूर सारत आपल्या गायन-वादनाच्या कौशल्याने रसिक प्रेक्षकांवर त्यांनी मोहिनी घातली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

वादन खुला गट ः प्रथम क्रमांक – रोहन लाखे, द्वितीय – विनायक पाटील, तृतीय – अथर्व काळेकर, उत्तेजनार्थ – नेताजी कानेकर, सतीश हिरपुडे.

वादन शालेय गट ः प्रथम क्रमांक – सिद्धेश सावंत, द्वितीय – पार्थ सुतार, तृतीय – यश धुमाळ, उत्तेजनार्थ – उदय गुरव.

गायन खुला गट ः प्रथम क्रमांक – श्रीकांत सावंत, द्वितीय – विनायक पाटील, तृतीय – महालिंग धमामे, उत्तेजनार्थ – भूषण तुळसकर, पार्थ सुतार.

गायन शालेय गट ः प्रथम क्रमांक – समर्थ देसाई, द्वितीय – पार्थ सुतार, तृतीय – यश धुमाळे. उत्तेजनार्थ ः जीवन फडतरे, सिद्धेश सावंत.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT