Web Whats App New Feature: व्हॉट्स ॲपने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फीचर आणलं आहे. आता वेब व्हॉट्स ॲप वापरणाऱ्या ग्राहकांना व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार आहे. आतापर्यंत ग्रुप व्हिडिओ कॉल आणि ऑडिओ कॉलसाठी स्मार्ट फोन किंवा व्हॉट्स ॲप Windows App वापरावं लागत होत.
मात्र आता तुम्ही जरी दुसऱ्याचा लॅपटॉप वापरत असला तरी येणाऱ्या काही दिवसात तुम्ही व्हॉट्स ॲप वेब द्वारे देखील व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल करू शकणार आहे. याबाबतची माहिती WAbetainfo यांनी शेअर केली आहे.
WhatsApp च्या येणाऱ्या फिचर्स आणि अपडेट्स ट्रॅक करणारी वेबसाईट WAbetainfo यांनी सांगितलं की आता व्हॉट्स ॲपवर वेब व्हर्जनवर ग्रुप व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल्सला सपोर्ट मिळणार आहे. सध्या हे फिचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. अजून बीटा व्हर्जनसाठी देखील हे अपडेट रोल आऊट केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार या फीचर्सचे स्क्रीनशाट्सदेखील शेअर करण्यात आले आहेत.
सध्याच्या घडीला WhatsApp Web यांनी ग्रुप चॅटच्यावर व्हिडिओ कॉल्सचा आयकॉन मिळतो. तुम्ही जर व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करता त्यावेळी तिथं Windows App सोबत ग्रुप कॉलचा पर्याय मिळतो. येणाऱ्या काही दिवसात Windows App शिवाय देखील ग्रुप व्हिडिओ आणि व्हॉईस चॅट कॉल करण्याची सुविधा मिळणार आहे.
WhatsApp Web मध्ये मिळणाऱ्या या नव्या अपडेटमध्ये काही बंधने देखील असतील. सध्याच्या घडीला तर WhatsApp ने याबाबत अधिकृत काही माहिती दिलेली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये WhatsApp Web च्या ग्रुप व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलवेळी स्टँडर्ड व्हिडिओ की HD व्हिडिओचा सपोर्ट मिळणार हे स्पष्ट होईल.
Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार आधी सांगण्यात आलं होतं की बीटा व्हर्जनमध्ये कव्हर फोटोसोबत एक नवीन प्रायव्हसी कन्ट्रोल दिले जाणार आहे. आता हे नवे कंट्रोल अन् फिचर्स ios युजर्ससाठी देखील देण्यात आले आहेत. याद्वारे आता ग्राहक स्वतः कोण कव्हर फोटो पाहू शकतात हे स्वतःच सेट करू शकणार आहेत.