What's App New Feature: कोणालाही न समजता हळूच व्हॉट्स ॲप ग्रुपमधून कसं लेफ्ट व्हायचं?

What's App ने नवे फिचर लाँच केल आहे. याद्वारे आता आपण कोणलाही न कळता नको असलेल्या What's App ग्रुपमधून लेफ्ट होऊ शकतो.
What's App Feature
What's App Featurepudhari photo
Published on
Updated on

What's App New Privacy Feature: तुम्ही अशा What's App ग्रुपमध्ये अडकला आहात का जिथं सतत मेसेजची नोटिफिकेशन येत आहेत. अन् त्या फालतूच्या चर्चेत तुम्हाला सहभागी व्हायचं नाहीये. तुम्ही सतत त्या ग्रुपमधून लेफ्ट होण्याच्या प्रयत्न करत आहात मात्र मित्र तुम्हाला पुन्हा त्या ग्रुपमध्ये अॅड करून तुमचा एकप्रकारे छळ करत आहेत...? तुम्हाला सर्वांचा नकळत तो ग्रुप लेफ्ट करायचा आहे मात्र तुम्ही त्यात अयशस्वी होत आहात...? मग ही बातमी तुमच्यासाठी!

What's App Feature
Yavat Violence: Whats App वरचं स्टेटस अन् दोन गट भिडले, यवतमध्ये तणाव का निर्माण झाला? गृहमंत्र्यांनी सगळंच सांगितलं

गेल्या काही काळापासून ग्रुप लेफ्ट करणं हे भीतीदायक होतं. इथं ग्रुपमधील मेसेज पाहता येणार नाही हा विषय नाही तर ग्रुपमधून लेफ्ट झाल्यावर सोशल सर्कलमधून होणारी टोमणेबाजी याची सर्वात मोठी भीती होती. तुम्ही जर ग्रुपमधून लेफ्ट झाला तर त्याचं सर्वांना नोटिफिकेशन जाईल अन् ते तुमच्या लेफ्ट होण्याची उलट सुलट चर्चा करतील. तुम्हाला सतत त्याबाबत विचारणा होईल काहीजण बळजबरीनं तुम्हाला पुन्हा ग्रुपमध्ये अॅड करतील.

मात्र आता ही भीती बाळगण्याची गरज नाही. What's App तुमची ही काळजीवजा भीती ओळखून एक फिचर आणलं आहे. आता तुम्ही व्हॉट्स अॅप ग्रुपमधून अत्यंत गुप्तपणे लेफ्ट होऊ शकता. याची ग्रुपमधल्या इतर सदस्यांना कल्पना देखील येणार नाही. What's App चे हे फिचर ज्यांना प्रायव्हसी आणि मानसिक शांतता हवी आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता तुम्ही ग्रुपमधून एक्झिट झाला आहात हे कोणाला ब्रॉडकास्ट होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात या भन्नाट फिचरचा वापर कसा करायचा...

What's App Feature
server down whats app facebook instagram तब्बल ६ तास ‘डाऊन’; भारतातील ५३ कोटी युजर्संना फटका
  • सर्वात आधी ग्रुपच्या नावावर क्लिक करा. त्यानंतर ग्रुप इन्फॉर्मेशन पेज ओपन होईल.

  • स्क्रोल डाऊन करून शेवटी असलेल्या एक्झिट ग्रुप या ऑप्शनवर या.

  • यानंतर ग्रुप सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर या ऑप्शनवर क्लिक करा.

  • त्यानंतर एक मेसेज येईल त्यावर only the group admins will be notified असं लिहिलेलं असेल.

आयफोन वापरकर्त्यांसाठी अशी आहे प्रोसेस

  • कोणता ग्रुप लेफ्ट करायचा आहे तो ग्रुप निवडा

  • डाव्या बाजूला स्वाईप करा. More बटणवर क्लिक करा

  • त्यानंतर मेन्यु मधील एक्झिट ग्रुप सिलेक्ट करा

  • त्यानंतर only admins will know you've left यावर क्लिक करा

What's App Feature
Smart Glasses Payment Feature | काय सांगता... एकटक पाहताच गॉगलमधून होणार खटाखट पेमेंट

Android वापरकर्त्यांसाठी अशी आहे प्रोसेस

  • अँड्रॉईड युजर्सनी जो ग्रुप लेफ्ट करायचा आहे त्या ग्रुपवर दीर्घकाळ क्लिक करा

  • त्यानंतर मेन्यूमध्ये Exit Group असा पर्याय येईल.

  • तुम्ही Exit Group निवड क्लिक केल्यावर only admins are notified हा पर्याय निवडा.

तुम्ही वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून कोणालाही न कळता What's App ग्रुपमधून लेफ्ट होऊ शकता आणि मानसिक शांतता मिळवू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news