sarvam startup developing indias first ai model
बंगळुरू: भारत सरकारने देशातील पहिले स्वदेशी AI (Artificial intelligence) लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) मॉडेल विकसित करण्यासाठी बंगळुरू स्थित स्टर्टअप आधारित 'सर्वम'ची निवड केली आहे. चीनचे स्वस्त मॉडेल डीपसीकची (DeepSeek) वाढती लोकप्रियता पाहता भारताने हे पाऊल उचलले आहे.
देशातील पहिले स्वदेशी AI (Artificial intelligence) तयार करण्यासाठी आलेल्या ६७ अर्जांमधून केंद्र सरकारने 'सर्वम' ची निवड केली आहे. स्वदेशी AI चे मॉडेल बनवण्यासाठी सरकारकडून 'सर्वम'ला संगणकीय संसाधनांच्या स्वरूपात मदत मिळणार आहे.
'सर्वम' ही भारताच्या महत्त्वकांक्षी १० हजार ३७० कोटी रुपयांच्या 'इंडिया एआय' (India AI) मिशन अंतर्गत अधिकृतपणे मान्यता मिळालेली पहिली स्टार्टअप कंपनी आहे. सरकार सध्या इतर अन्य शेकडो प्रस्तावांचे देखील मूल्यांकन करत आहे. यावर 'सर्वम'ने त्यांचे एआय (AI) मॉडेल तार्किक क्षमतांनी सुसज्ज असेल. आवाज केंद्रीत असेल आणि भारतीय भाषांमध्ये प्रवीणता विकसित करेल. हे एआय मॉडेल लोकसंख्या-स्तरीय वापरासाठी विकसित केले जाईल, असेही म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, सरकार 'सर्वम' स्टर्टअपला सहा महिन्यांसाठी ४ हजार ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) देईल जेणेकरून ते त्यांचे मॉडेल विकसित करू शकेल आणि त्यांना प्रशिक्षण देऊ शकेल. भारतात एआय डेटा सेंटर्स स्थापन करण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांद्वारे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (GPUs) उपलब्ध करून दिले जातील.
भारताचे पहिले स्वदेशी AI मॉडेल ७० अब्ज पॅरामीटर्ससह तयार केले जाईल. आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या मॉडेलमध्ये प्रोग्रामिंग आणि अभियांत्रिकी क्षेत्रासंबंधी अनेक नवोपक्रम असतील. ज्यामुळे ते जगातील सर्वोत्तम मॉडेल्सना टक्कर देऊ शकेल. हे मॉडेल विशेषतः भारतीय भाषांसाठी सुधारित केले जाईल आणि ते ओपन-सोर्स केले जाणार नाही, असेही अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.