OpenAI Tests Ads in ChatGPT Pudhari
तंत्रज्ञान

OpenAI Tests Ads: ChatGPT मध्ये जाहिराती दिसणार? 'युजर्सच्या संभाषणाचा गैरवापर होणार', म्हणत कंपनीतील संशोधकाचा राजीनामा

OpenAI Tests Ads in ChatGPT: OpenAI ने ChatGPT मध्ये जाहिरातींची टेस्टींग सुरू केल्यानंतर संशोधक झोई हित्झिग यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या मते, जाहिरात मॉडेलमुळे युजर्सच्या खासगी संभाषणांचा गैरवापर होण्याचा धोका आहे.

Rahul Shelke

Chatgpt Ads Openai Researcher Quits: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी OpenAIने या आठवड्यात ChatGPTमध्ये जाहिरातींची टेस्टींग सुरू केली आहे. मात्र या निर्णयावर कंपनीतील माजी संशोधक झोई हित्झिग यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.

झोई हित्झिग यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखात सांगितलं की, OpenAI आता सोशल मीडिया कंपन्यांनी पूर्वी केलेल्या चुकांच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी विशेषतः फेसबुकच्या उदाहरणाचा उल्लेख करत इशारा दिला आहे.

झोई या OpenAI मध्ये दोन वर्षे काम करत होत्या. त्या काळात त्यांनी मॉडेलची किंमत, सुरक्षितता आणि धोरणांवर काम केलं होतं. त्यांच्या मते, ChatGPT मध्ये जाहिराती आणणं हा फक्त छोटा बदल नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत.

लोक ChatGPTला आपल्या खासगी गोष्टी सांगतात

झोई यांचा आक्षेप आहे की, लोक ChatGPT वर अत्यंत वैयक्तिक माहिती शेअर करतात. आरोग्याच्या तक्रारी, नातेसंबंधातील अडचणी, आर्थिक चिंता, श्रद्धा… अगदी आयुष्याशी संबंधित प्रश्न. त्या म्हणतात, “आज ChatGPT कडे माणसांच्या मनातल्या भावना आणि आयुष्याशी संबंधित घटनांचा संग्रह तयार झाला आहे आणि ही ऐतिहासिक गोष्ट आहे.”

आत्तापर्यंत लोक ChatGPT शी मोकळेपणाने बोलत होते, कारण त्यामागे कोणताही व्यावसायिक अजेंडा नाही, असं त्यांना वाटत होतं. पण जाहिराती आल्यावर हा विश्वास तुटू शकतो, असा त्यांचा इशारा आहे.

OpenAI ने काय सांगितलं?

OpenAI ने सांगितलं की, जाहिराती फक्त उत्तरांच्या शेवटी दिसतील, त्या स्पष्टपणे “Ad” म्हणून ओळखल्या जातील आणि ChatGPT च्या उत्तरांवर त्याचा परिणाम होणार नाही. पण झोई यांचं म्हणणं आहे की खरी समस्या जाहिराती नाहीत, तर उद्याचं मॉडेल आहे. एकदा जाहिरात-आधारित व्यवसाय सुरू झाला की, हळूहळू एंगेजमेंट वाढवा, युजर जास्त वेळ ठेवा, असा दबाव तयार होतो. फेसबुकनेही सुरुवातीला अशीच आश्वासनं दिली होती, पण नंतर ती मागे पडली, असं त्या सांगतात.

जाहिराती वाईट नाहीत, पण नियंत्रण हवं

झोई सांगतात की, जाहिराती वाईट नाहीत. AI चालवणं महाग आहे आणि उत्पन्नासाठी जाहिराती आवश्यक आहेत. मात्र यासाठी स्वतंत्र नियम आणि युजर्सना त्यांच्या डेटावर नियंत्रण असणं आवश्यक आहे. त्यांच्या मते, ChatGPT सारख्या AI वर जाहिराती असतील, तर लोकांचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं. सध्या त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे पुरेशी साधनं नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT