iPhone 17 Launch in India price & Offer :
बहुप्रतिक्षित आयफोन १७ ची सिरीज भारतात लाँच झाली आहे. भारतात आयफोनची क्रेज जबरदस्त आहे. त्यामुळेच आयफोन १७ लाँच होणार म्हटल्यावर स्टोअरच्या बाहेर त्याच्या चाहत्यांनी काल रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. हा नवा आयफोन १७ हा ios 26 सॉफ्टवेअर आणि अद्यावत सिलिकॉन बॅटरीनं लेस असणार आहे. याचबरोबर नव्या अॅपल १७ मध्ये अनेक AI फिचर्स असणार आहेत. यात अॅपल इंटेलिजन्सची सेवा देखील देण्यात आली आहे.
iPhone 17 मालिकेचे भारतातील दर आणि ऑफर्स अधिकृतपणे जाहीर झाले असून, या वेळी सर्व मॉडेल्सची सुरुवात 256GB स्टोरेजपासून होते. त्यामुळे किंमत जरी जास्त वाटत असली तरी दिलेल्या स्टोरेजमुळे हे मॉडेल्स स्वस्त पडणार आहेत.
iPhone 17 (256GB): ₹82,900
iPhone 17 (512GB): ₹1,02,900
iPhone Air (256GB): ₹1,19,900
iPhone Air (512GB): ₹1,39,900
iPhone Air (1TB): ₹1,59,900
iPhone 17 Pro (256GB): ₹1,34,900
iPhone 17 Pro (512GB): ₹1,54,900
iPhone 17 Pro (1TB): ₹1,74,900
iPhone 17 Pro Max (256GB): ₹1,49,900
iPhone 17 Pro Max (512GB): ₹1,69,900
iPhone 17 Pro Max (1TB): ₹1,89,900
iPhone 17 Pro Max (2TB): ₹2,29,900
Apple चे अधिकृत स्टोअर: पुणे, बेंगळुरू, दिल्ली, मुंबई
ऑनलाइन: Apple च्या वेबसाईटवर तसेच Amazon, Flipkart आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर देखील हा फोन उपलब्ध आहे.
अधिकृत रिटेलर्स: Croma, Vijay Sales, Ingram Micro India, Quick-commerce अॅप्स
Ingram Micro India:
एक्सचेंज बोनस ₹7,000 पर्यंत
24 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI
iPhone 17 वर ₹6,000 इन्स्टंट कॅशबॅक (6 महिने नो-कॉस्ट EMI)
iPhone 17 Pro, Pro Max व Air वर ₹4,000 कॅशबॅक
विजय सेल्स :
iPhone 17 (256GB) वर ₹6,000 डिस्काऊंट
iPhone 17 Pro व Pro Max वर ₹4,000 डिस्काऊंट
iPhone Air वर SBI कार्डाने ₹4,000 इन्स्टंट डिस्काऊंट
क्रोमा :
iPhone 17 वर ₹6,000 इन्स्टंट डिस्काऊंट
सहा महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI
इतर Pro व Air मॉडेल्सवर ऑफर्स अद्याप घोषित नाहीत