Instagram Plus Subscription Pudhari
तंत्रज्ञान

Instagram Plus Subscription: आता इंस्टाग्राम वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार? कोणते बदल होणार?

Instagram Plus Subscription: Meta Instagram Plus नावाचा नवीन पेड सब्सक्रिप्शन प्लॅन टेस्ट करत आहे. या प्लॅनमध्ये अनोनिमस स्टोरी व्ह्यू आणि प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Instagram Plus Subscription: सोशल मीडिया क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. Meta आपल्या लोकप्रिय ॲप Instagram साठी ‘Instagram Plus’ नावाने नवा प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे. या प्लॅनमुळे इंस्टाग्राम वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

काय आहे Instagram Plus?

Instagram Plus हा एक पेड (सशुल्क) सब्सक्रिप्शन प्लॅन असेल, ज्यामध्ये फ्री यूजर्सना उपलब्ध नसलेले अनेक एक्सक्लुझिव्ह फीचर्स मिळणार आहेत. Meta चा उद्देश म्हणजे सामान्य यूजर्सनाही प्रीमियम अनुभव देणे आणि ॲपमधील एंगेजमेंट वाढवणे.

कोणत्या देशांत सुरू आहे टेस्टिंग?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Instagram Plus सध्या काही देशांमध्येच टेस्ट केलं जात आहे. यामध्ये मेक्सिको, जपान आणि फिलीपिन्सचा समावेश आहे. याचा अर्थ, हा प्लॅन अजून जागतिक स्तरावर लॉन्च झालेला नाही. मात्र, यशस्वी ठरल्यास भारतासह इतर देशांतही तो लवकरच येऊ शकतो.

Instagram Plus मध्ये काय खास मिळणार?

या प्रीमियम प्लॅनमधील काही फीचर्स सध्या चर्चेत आहेत —

📌अनोनिमस स्टोरी व्ह्यू (Anonymous Story View)
तुम्ही कोणाची स्टोरी पाहिली हे समोरच्या व्यक्तीला कळणार नाही.

📌री-व्यू काउंट (Story Rewatch Count)
तुमची स्टोरी किती वेळा पुन्हा पाहिली गेली हे कळेल.

📌मल्टिपल ऑडियन्स लिस्ट
Close Friends व्यतिरिक्त वेगवेगळ्या ग्रुपसाठी वेगवेगळ्या स्टोरी लिस्ट तयार करता येतील.

📌स्टोरी कालावधी वाढवण्याची सुविधा
24 तासांपेक्षा जास्त काळ स्टोरी ठेवता येईल.

📌हायलाइट बूस्ट फीचर
आठवड्यातून एकदा स्टोरीला पुढे बूस्ट करण्याची संधी.

यासोबतच अॅनिमेटेड रिऍक्शन पाठवता येतील. हे फीचर्स विशेषतः तरुण आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी आकर्षक ठरू शकतात.

Verified प्लॅनपेक्षा वेगळा कसा?

Meta कडे आधीपासूनच Verified प्लॅन आहे, ज्यामध्ये ब्लू टिक आणि सिक्युरिटी फीचर्स मिळतात. मात्र Instagram Plus हा प्लॅन सामान्य यूजर्ससाठी डिझाइन केला जात आहे.

रिपोर्ट्सनुसार Instagram Plusसाठी दर महिना अंदाजे 100 ते 200 रुपये द्यावे लागू शकतात. भारतामध्ये लॉन्च झाल्यानंतर यामध्ये बदल होऊ शकतो.

Instagram Plus हा Meta चा एक मोठा प्रयोग आहे. जर हा प्लॅन यशस्वी झाला, तर भविष्यात सोशल मीडिया वापरण्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT