Instagram Reel Tragedy | 'रील' बनवणे बेतले जीवावर..! १२० किमी वेगाने जाणार्‍या कारला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्‍यू

Instagram Reel Tragedy | 'रील' बनवणे बेतले जीवावर..! १२० किमी वेगाने जाणार्‍या कारला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्‍यू

Instagram Reel Tragedy | अपघातापूर्वी काही वेळ आधी इन्स्टावर शेअर केले सुसाट कार चालवितानाचे व्‍हिडिओ
Published on

Instagram Reel Tragedy

नवी दिल्ली : गुजरातच्या जेतपूरमध्ये शनिवारी रात्री एका भरधाव कारचा भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या काही काळ आधी, कार चालवणाऱ्या अवध तिवारी याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर १२० किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत असतानाचे व्हिडिओ शेअर केले होते.

नेमकी घटना काय?

रिपोर्टनुसार, हे तरुण सुमारे १२० किमी प्रतितास वेगाने आपली सेडान कार चालवत होते. मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने शूट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चालक तिवारी याने डाव्या हातात मोबाईल पकडून रील रेकॉर्ड करत होता, तर दुसऱ्या हाताने स्टेअरिंग पकडले होते. दुसऱ्या एका क्लिपमध्ये बाजूच्या सीटवर बसलेली व्यक्ती कारच्या वेगाचे चित्रीकरण करताना दिसत आहे.

Instagram Reel Tragedy | 'रील' बनवणे बेतले जीवावर..! १२० किमी वेगाने जाणार्‍या कारला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्‍यू
Beed Crime : सोशल मीडियावरील स्टोरीचा वाद जीवावर बेतला; रुईनालकोलमध्ये तरुणाचा खून

वेगाच्‍या नादात कारवरील नियंत्रण सुटले, भीषण अपघात

वेगाच्या नादात कारवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकाला (डिव्हायडरला) जोरात धडकली.या भीषण धडकेत अवध तिवारी याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा २० वर्षीय मित्र देवराज गोसाई याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गाडीतील तिसरा प्रवासी अक्षय प्रवीणभाई वाघेला याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्‍यान, अवध तिवारीचे इन्स्टाग्रामवर ३,५०० पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. त्याने आपल्या प्रोफाइलवर वेगवेगळ्या गाड्यांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ यापूर्वीही पोस्ट केले होते.

Instagram Reel Tragedy | 'रील' बनवणे बेतले जीवावर..! १२० किमी वेगाने जाणार्‍या कारला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्‍यू
Ines Faria Mumbai Video: 'मॅम, एक सेल्फी फक्त…’ मुंबईत आलेल्या विदेशी इन्फ्लुएन्सर तरुणीचा फोटोसाठी पाठलाग; व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news