तुमच्या बँक खात्यातून प्रत्येक महिन्याला काही रक्कम कापली जातेय आणि तुम्हाला कल्पनाही नाही का? यामागचं कारण UPI AutoPay असू शकतं. अनेकदा आपण Netflix, Amazon Prime, मोबाईल रिचार्ज, वीज बिल, बीमा प्रीमियम यांसारख्या सेवांसाठी AutoPay सुरू करतो आणि नंतर विसरून जातो. पण सेवा वापरणं थांबवूनही पैसे कापले जातात.
UPI AutoPay ही एक डिजिटल सुविधा आहे जी तुम्हाला तुमच्या UPI अॅपवरून कोणत्याही सेवा किंवा सदस्यत्वासाठी ई-मँडेट सेट करण्याची संधी देते. एकदा सुरू केल्यानंतर प्रत्येक महिन्याला निश्चित तारखेला तुमच्या खात्यातून पैसे आपोआप वजा होतात.
मोबाईल / DTH रिचार्ज
वीज किंवा पाण्याचं बिल
बीमा प्रीमियम
EMI किंवा लोनचे हप्ते
SIP किंवा म्युच्युअल फंड
ऑनलाइन क्लासेस किंवा जिम फी
PhonePe, Google Pay, Paytm यापैकी तुमचं UPI अॅप उघडा
सेटिंग्ज किंवा प्रोफाइल सेक्शनमध्ये जा
‘AutoPay’ किंवा ‘Mandates’ यावर टॅप करा
अॅक्टिव्ह असलेल्या सर्व सेवा दिसतील
बंद करायची सेवा निवडा
‘Cancel’ किंवा ‘Revoke’ पर्यायावर क्लिक करा
जर अनावश्यक पेमेंट झाला असेल, तर लगेच संबंधित कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा. 24-72 तासांत रिफंड मिळू शकतो. जर कंपनीकडून मदत मिळाली नाही, तर बँकेशी संपर्क साधा आणि असे व्यवहार ब्लॉक करण्याची विनंती करा.
AutoPay सुरू करताना विचारपूर्वक निर्णय घ्या
जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या सेवा वेळोवेळी तपासा
बँकेकडून येणारे SMS आणि UPI नोटिफिकेशन्सकडे दुर्लक्ष करू नका