Alarm Snooze Side Effects | वारंवार अलार्म 'स्नूज' करणं ठरतंय धोकादायक! डॉ. श्रीराम नेने यांचा सल्ला ऐका

Alarm Snooze Side Effects | बहुतेक लोक सकाळी अलार्म वाजल्यानंतर त्वरित उठण्याऐवजी 'स्नूज' बटन दाबून आणखी काही मिनिटं झोपण्याचा प्रयत्न करतात.
Alarm Snooze Side Effects
Alarm Snooze Side EffectsCanva
Published on
Updated on

Alarm Snooze Side Effects

बहुतेक लोक सकाळी अलार्म वाजल्यानंतर त्वरित उठण्याऐवजी 'स्नूज' बटन दाबून आणखी काही मिनिटं झोपण्याचा प्रयत्न करतात. ही सवय सुरुवातीला सुखद वाटू शकते, पण आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम गंभीर असू शकतात. कार्डियोलॉजिस्ट आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी याबाबत इन्स्टाग्रामद्वारे महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Alarm Snooze Side Effects
Growth Harmone Problem |समस्या ग्रोथ हार्मोनची

डॉ. नेने यांचा इशारा

डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, वारंवार अलार्म स्नूज केल्याने आपल्या झोपेचा नैसर्गिक चक्र बिघडतो. यामुळे शरीर आणि मेंदूवर जणू काही वारंवार 'झटका' बसतो. परिणामी दिवसभर थकवा, चिडचिड, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि मानसिक थकवा जाणवतो.

स्लीप इनर्शियाचं प्रमाण वाढतं

त्यांनी स्पष्ट केलं की, झोपेमधून उठल्यानंतर जाणवणारी सुस्ती आणि आळस म्हणजेच ‘स्लीप इनर्शिया’, ती स्नूजमुळे अधिक तीव्र होते. कारण अलार्म वाजल्यानंतर पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करताना शरीर गहन झोपेच्या दिशेने जातं, पण अल्पावधीत पुन्हा अलार्म वाजल्याने मेंदूला धक्का बसतो.

Alarm Snooze Side Effects
Maharashtra Rain Update| राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता; कोकण आणि घाटमाथ्याला इशारा, विदर्भात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम

मेंदू आणि हृदयावर परिणाम

डॉ. नेने यांच्या मते, हे सततचे खंडित झोप चक्र मेंदूवर दडपण निर्माण करतं. दीर्घकाळ असे झाले तर हृदयाचं आरोग्यही बिघडू शकतं. त्यामुळे त्यांनी या सवयीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

उपाय काय?

डॉ. नेने यांनी सांगितलं की झोपेची वेळ निश्चित ठेवा. एकच अलार्म ठेवा, स्नूज टाळा. अलार्म मोबाईल बिछान्यापासून दूर ठेवा, जेणेकरून तो बंद करताना उठावं लागेल. सकाळी उठल्यानंतर हलकासा व्यायाम करा. यामुळे शरीर सशक्त राहील आणि दिवस भरारीने सुरू होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news