Online / Digital payment Pudhari File photo
तंत्रज्ञान

Online / Digital payment: 1 ऑगस्टपासून तुमच्या 'या' सवयी बदला, नाहीतर Google Pay, PhonePe आणि Paytm वारताना होईल मोठी अडचण

NPCI new UPI guidelines: NPCI ने बँकांना आणि UPI अ‍ॅप्सना हे नियम सक्तीने पाळण्याचे आदेश दिले आहेत. नियम न पाळल्यास संबंधित बँक किंवा अ‍ॅपवर कारवाई देखील होऊ शकते.

मोनिका क्षीरसागर

Online / Digital payment updates

टेक न्यूज: UPI युजर्संसाठी ही महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. कारण 1 ऑगस्टपासून Google Pay, PhonePe, Paytm आणि इतर UPI अ‍ॅप्सवर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे (NPCI) काही नियम बदलणार आहेत. या बदलांमुळे तुमच्या रोजच्या व्यवहारांवर थेट परिणाम देखील होणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणते बदल होणार आहेत.

काय बदलणार आहे?

बॅलन्स चेक करण्यावर मर्यादा: आता प्रत्येक UPI अ‍ॅपवर दिवसातून जास्तीत जास्त 50 वेळा (काही बँकांसाठी 10 वेळा) बॅलन्स चेक करता येईल. यापेक्षा जास्त वेळा बॅलन्स तपासता येणार नाही. ही मर्यादा सामान्य वापरकर्त्यांसाठी पुरेशी असली तरी, वारंवार व्यवहार करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना अडचण येऊ शकते.

ट्रान्झॅक्शन स्टेटस पाहण्यावर मर्यादा: प्रत्येक व्यवहारानंतर फक्त ३ वेळा ट्रान्झॅक्शन स्टेटस रिफ्रेश करता येईल, आणि प्रत्येक वेळी किमान ९० सेकंदांची गॅप असावी लागेल.

लिंक्ड बँक अकाउंट्स चेक लिमिट: एका अ‍ॅपवर आपल्या फोन नंबरशी लिंक केलेले बँक खाते दिवसातून फक्त 25 वेळा पाहता येईल

ऑटोपे (AutoPay) व्यवहारांसाठी ठराविक वेळ: Netflix, म्युच्युअल फंड SIP, वीज/पाणी बिल यांसारख्या ऑटो डेबिट व्यवहार आता फक्त ठराविक वेळेत (सकाळी 6 ते रात्री 9 किंवा सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 या वेळेतच) प्रोसेस होतील. उर्वरित वेळेत ऑटोपे रिक्वेस्ट लगेच प्रोसेस होणार नाहीत.

हे बदल का केले जात आहेत?

  • नेटवर्कवरील लोड कमी करण्यासाठी: NPCI (नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने हे बदल जाहीर केले आहेत, जेणेकरून UPI प्रणालीवर येणारा ताण कमी होईल आणि व्यवहार अधिक जलद व सुरळीत होतील.

  • पुनरावृत्तीमुळे होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी: अनेक वेळा बॅलन्स किंवा ट्रान्झॅक्शन स्टेटस तपासल्याने नेटवर्कवर ताण येतो आणि कधी कधी UPI सेवा डाऊन होते. हे टाळण्यासाठी मर्यादा घालण्यात आली आहे.

ग्राहकांनी 'या' सवयी बदलाव्यात?

  • वारंवार बॅलन्स तपासणे टाळा: प्रत्येक व्यवहारानंतर लगेच बॅलन्स तपासण्याची सवय बदलावी लागेल.

  • ऑटोपे सेटिंग्ज तपासा: महत्त्वाचे ऑटो डेबिट व्यवहार ठराविक वेळेतच होतील, त्यामुळे वेळेची जाणीव ठेवा.

  • लिंक्ड अकाउंट्स तपासताना मर्यादा लक्षात ठेवा: दिवसातून 25 पेक्षा जास्त वेळा लिंक्ड अकाउंट्स तपासू नका.

नियम न पाळल्यास काय होईल?

हे बदल 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होतील. त्यामुळे वेळेत सवयी बदलून घ्या, अन्यथा पेमेंट करताना अडचणी येऊ शकतात. NPCI ने बँकांना आणि UPI अ‍ॅप्सना हे नियम सक्तीने पाळण्याचे आदेश दिले आहेत. नियम न पाळल्यास संबंधित बँक किंवा अ‍ॅपवर कारवाई होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT