Apple Spyware Warning
Apple ने iPhone वापरणाऱ्यांना चेतावणी दिली आहे की एक अत्यंत घातक Mercenary Spyware Attack जगभरात पसरत आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की हा स्पायवेअर सामान्य हॅकिंग किंवा व्हायरसपेक्षा जास्त धोकादायक आहे. यामुळे वापरकर्त्यांची माहिती चोरली जाऊ शकते, किंवा डिव्हाइसवर संपूर्ण नियंत्रण मिळवले जाऊ शकते.
Apple ने अद्याप कोणत्या युजर्सला लक्ष्य करण्यात येणार आहे हे स्पष्ट केलं नाही. त्यामुळे ही धोक्याची सूचना सगळ्या iPhone युजर्ससाठी लागू आहे. अलीकडे काही पत्रकार आणि इतर वापरकर्त्यांना Apple कडून थेट अलार्मिंग नोटिफिकेशन्स मिळाली आहेत.
हे स्पायवेअर खासगी कंपन्यांनी तयार केलेले असते आणि विविध सरकारांना विकले जाते. हे टूल्स सरकार किंवा गुप्तचर संस्थांकडून निगराणीसाठी वापरले जातात. त्यामुळे याचे उद्दिष्ट एखाद्या व्यक्तीच्या हालचालींवर पूर्ण नियंत्रण ठेवणे हे असते.
Apple ने ही सूचना त्यांच्या Threat Notification System च्या माध्यमातून दिली आहे. याचा उपयोग Apple कंपनी गंभीर सायबर अटॅक्सबाबत वापरकर्त्यांना वेळेवर माहिती देण्यासाठी करते.
फोन अपडेट ठेवा:
Apple कडून आलेले सॉफ्टवेअर अपडेट्स वेळेवर इन्स्टॉल करा.
स्ट्रॉंग पासवर्ड वापरा:
फोनसाठी स्ट्रॉंग पासकोड ठेवा. शक्य असल्यास बायोमेट्रिक लॉक वापरा.
2FA वापरा:
जिथे शक्य असेल तिथे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) वापरा.
अनोळखी लिंक किंवा मेल टाळा:
कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ईमेल अटॅचमेंट्स किंवा व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक करू नका.