'AI' technology  Pudhari News network
तंत्रज्ञान

AI Hacks: एआय टूल्सचा योग्य वापर कसा करावा? जाणून घ्या स्मार्ट टिप्स

AI Hacks: एआय टूल्सचा योग्य वापर केल्यास मिळू शकतो मोठा फायदा, जाणून घ्या पाच महत्वाचे टिप्स

shreya kulkarni

आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) म्हणजे एक क्रांतिकारी साधन बनलं आहे. विशेषतः ChatGPT, Google Gemini, Microsoft Copilot, Anthropic Claude यांसारखे AI चॅट टूल्समुळे विद्यार्थ्यांपासून ते प्रोफेशनल्स, कंटेंट क्रिएटर्स, स्टार्टअप्स आणि कोडर्सपर्यंत सगळ्यांचं काम करण्याचं पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. मात्र, या टूल्सचा खरा फायदा घेण्यासाठी त्यांचा योग्य ट्रिक्ससह वापर करणं अत्यंत गरजेचं आहे.

AI टूल्सचा उपयोग जास्त प्रभावीपणे कसा करावा?

1. स्पष्ट आणि नेमके निर्देश द्या


AI टूल्सना उत्तम प्रतिसाद द्यायचा असेल, तर ‘मदत करा’सारखे अस्पष्ट निर्देश न देता, "डिजिटल शिक्षणाचे फायदे यावर २०० शब्दांचा निबंध लिहा" अशा स्वरूपाचे स्पष्ट आणि उद्दिष्ट सांगणारे कमांड वापरा.

2. संदर्भ द्या

AI ला उत्तम उत्तर देण्यासाठी संदर्भ आवश्यक असतो. उदाहरणार्थ, जुन्या लेखाचा सारांश हवा असेल, तर मूळ लेखाची लिंक किंवा मजकूर द्या. यामुळे टूल अधिक उपयुक्त आणि अचूक उत्तर देतो.

3. फॉलो-अप करून उत्तर सुधारून घ्या

AI कडून पहिल्याच प्रयत्नात परिपूर्ण उत्तर मिळेलच असं नाही. "हे सोप्या भाषेत लिहा", "यात एखादं उदाहरण जोडा", "थोडक्यात लिहा" असे फॉलो-अप करून उत्तरे आपल्या गरजेनुसार सुधारता येतात.

4. शैली आणि टोन निवडा

उत्तर कोणत्या शैलीत हवं आहे हे AI ला सांगा औपचारिक, मजेदार, संवादात्मक, तांत्रिक इ. उदाहरणार्थ, "तरुणांना आकर्षित करणारी सोशल मीडिया पोस्ट लिहा" अशा सूचना दिल्यास क्रिएटिव्ह आउटपुट अधिक चांगलं येतं.

5. गोपनीय माहिती शेअर करू नका

AI टूल्स सुरक्षित असले तरी गोपनीय माहिती जसं की बँक डिटेल्स, पासवर्ड, वैयक्तिक ओळख इ. कधीही शेअर करू नका. AI हा एक तांत्रिक टूल आहे, त्याला विश्वासू मित्र न समजता विवेकी साधन समजा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT