Monsoon Dating Trends pudhari
फीचर्स

Monsoon Dating Trends: ७६ टक्के भारतीय 'सिंगल' पावसाळ्यात जोडीदारासाठी भुकेले, सर्व्हेत डेटिंगबाबतच्या आश्चर्यकारक गोष्टी समोर

Anirudha Sankpal

Monsoon Dating Trends: यंदाच्या मानसूनमध्ये आपल्या जोडीदारासोबत मस्त फिरायला जाणे, रोमँटिक वातावरणात जोडीदारासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करणे नॉर्मल गोष्ट. एका छत्रीत रिमझिम पावसाची मजा घेणं काही औरच सुख असतं. सध्या पावसाळा सुरू आहे. सर्व निसर्गरम्य ठिकाणे त्यांच्या सैंदऱ्यानं फुलून आली आहेत. मात्र भारतातील तब्बल ७६ टक्के सिंगल लोकं या सौंदऱ्यात आपल्या जोडीदारासोबत फिरणं मिस करत आहेत.

जवळपास २५०० भारतीय सिंगल लोकांचा एका डेटिंग अॅपने सर्व्हे केला. हा सर्व्हे २९ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात जवळपास ७६ टक्के सिंगल लोक हे आपल्या जोडीदारासोबत पावसाळी रोमान्सचा अनुभव घेण्यापासून अजून वंचित राहिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ४९ टक्के सिंगल लोक त्या डेट्सचं प्लॅनिंग पुढं ढकलत आहेत. ते प्लॅन्स करण्याची फार घाई करत नाहीयेत.

सर्व्हेमधील निम्मे म्हणजे ५४ टक्के लोकांनी दोघेही अनपेक्षितरित्या पाऊस किंवा ट्रॅफिकमुळे घरातच अडकून पडण्यामुळे त्यांच्यामध्ये एक कनेक्शन निर्माण झालं आहे. पावसामुळं त्यांचे रिलेशनशिप फास्टट्रॅक होण्याची शक्यता आहे. ज्या तीन तासाच्या ट्रॅफिक जॅमला तुम्ही नावे ठेवत आहात त्यावेळेतच आश्चर्यकारकरित्या मॅचमेकिंगचे जास्तीजास्त प्रयत्न होत आहेत.

सर्व्हेतील अर्धे लोकं हे मॉन्सूनमुळे ते आपल्या जोडीदाराच्या जास्त जवळ आले आहेत असं सांगितलं. ४१ टक्के लोक त्यांचा पावसाळ्यातील संपूर्ण दिवस एकत्र घालवत आहेत. त्यावरून त्यांचे नाते आता गंभीर स्वरूप घेत आहे हे दिसून येतं. २४ टक्के लोकांनी ज्यावेळी पावसात ज्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीला कॉल करणारे पहिले व्यक्ती असता त्यावेळी स्वप्नवत गोष्टी सत्यात उतरण्यास सुरूवात होते असं सांगितलं.

सर्व्हेतील अर्ध्या लोकांनी मॉनसून तुम्ही ज्या संभाव्य जोडीदाराबाबत फार कॅज्युअल असता त्यांना जवळ आणण्याचं काम करतो. ४१ टक्के लोकं हे पाऊस पडतोय तू कुठं आहेस. असं विचारतात. जसजसे ढग दाटून येतात डेटिंगचे मॅप देखील हळू हळू जवळ येऊ लागतात.

पावसाळी दिवसात ४४ टक्के लोकं हे जवळच्या कॉफी शॉपमध्ये डेटला जाणे पसंत करतात. तर २६ टक्के लोक कोणच्यातरी घरातील प्रायव्हसीची निवड करतात. आश्चर्यकारकरित्या १३ टक्के लोक हे एकत्र काम करण्याचं ठिकाण निवडतात. मॉन्सूनमध्ये मला काम आहे आणि मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे यामधील रेषा अंधुक झाली आहे.

पावसाळी दिवसात सगळ्यांचा लूक बिघडतो. केस विस्कटतात, कपडे भिजून अंगाला चिकटतात, मेकप वाहून जातो. मात्र फक्त २६ टक्के लोकं मॉन्सून डेटिंगमध्ये मेसिनेस आणतो असं मानतात. इतर २६ टक्के लोकांना आकर्षकपणाचा काही फरक पडत नाही. १९ टक्के लोकांना नुकतेस पावसातून येणं हे आकर्षक वाटतं. मात्र जरी पावसामुळं परफेक्ट वाटणारी डेट बिघडली तरी पुढं जे काही होतं ते महत्वाचं असतं.

जवळपास ३४ टक्के लोकांनी ज्यावेळी प्लॅन फिसकटतो त्यावेळी स्पष्ट आणि योग्यवेळेचं कम्युनिकेशन हा मोठा ग्रीन फ्लॅन असतो असं सांगितलं. तर २१ टक्के लोकांनी जे त्वरित नवीन प्लॅन करतात तो नाते पुढे नेण्यासाठी ग्रीन फ्लॅग असतो. हॅपनचा सर्व्हेमध्ये असं दिसून येत आहे की भारतात मॉन्सून सिजन हा जोडीदारासोबत एका गोड कैदेत राहण्याचा सिजन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT