Infosys Fine For Timing Tracking pudhari
फीचर्स

Infosys Fine For Timing Tracking: इन्फोसिसला ठोठावला मोठा दंड... कर्मचाऱ्यांचे टायमिंग ट्रॅकिंग पडलं महागात

Anirudha Sankpal

Infosys Fine For Timing Tracking: देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसला फ्रान्सच्या एका सरकारी लेबर अथोरिटीने १ लाख ७५ हजार युरोचा म्हणजे जवळपास २ कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. कंपनीने ही करावाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास रेकॉर्ड करण्याच्या सिस्टममुळं ठोठावला आहे.

युरोपात कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कडक कायदे आहेत. तिथं कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ठरलेल्या कामाच्या तासापेक्षा जास्त काळ काम करवून घेऊ शकत नाही. जर त्याला त्या कामाचे अतिरिक्त पैसे मिळत असतील तरच कंपनी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त तास काम करून घेऊ शकते. जर एखादा कर्मचारी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ करण्यास नकार देत असेल आणि ज्यादाचे काम करण्यासाठी कंपनी त्याच्यावर दबाव टाकत असेल तर युरोपमध्ये त्या कंपनीवर दंड आकारला जातो.

फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इन्फोसिसचे टाईम ट्रॅकिंग सिस्टम त्यांच्या नियमानुसार पूर्णपणे योग्य नव्हता. कंपनीने मात्र या दंडामुळे त्याच्या व्यवसाय आणि आर्थिक स्थितीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाहीये असं सांगितलं.

इन्फोसिसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार त्यांनी DRIEETS Île-de-France नावाच्या एका फ्रान्सच्या लेबर अथॉरिटीकडून दंड ठोठावल्याची नोटीस मिळाली आहे.

कंपनीच्या मते हे प्रकरण कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासाचे रेकॉर्ड ठेवणाऱ्या सिस्टमशी निगडीत आहे. अधिकाऱ्यांना तपासात ही सिस्टम फ्रान्सच्या कामगार कायद्याच्या काही अटींचे उल्लंघन करते असं आढळून आलं.

मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्सच्या अथॉरिटीने इन्फोसिसच्या सिस्टमच्या विश्वसनीयता, रेकॉर्डची तपासणी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासाच्या बाबात योग्य चेकिंगशी निगडीत त्रुटी आढळून आल्या आहेत.

ही सिस्टम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाची वेळ ज्या प्रकारे फ्रान्सच्या कायद्यात आहे त्या प्रमाणे रेकॉर्ड करत नव्हती. मात्र या मध्ये कोणत्या कर्मचाऱ्यांशी हे प्रकरण निगडीत आहे ते सांगण्यात आलेले नाही. इन्फोसिसने आपल्या वक्तव्यात आम्ही या प्रकरणाचा रिव्ह्यू करून आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करू असं सांगितलं. कंपनीने या दंडामुळं वित्तीय स्थिती आणि दैनंदिन कामकाजावर कोणता परिणाम झालेला नाही.

हे प्रकरण अशा वेळी समोर आले आहे ज्यावेळी इन्फोसिस भारतात देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या ऑफिसला येण्याच्या नियमांमुळं चर्चेत आलं आहे. गेल्या काही महिन्यात कंपनीने कर्मचाऱ्यांना आठवड्यात जास्त दिवस ऑफिसमधून काम करण्याची अट टाकली आहे. मात्र फ्रान्समध्ये झालेला हा दंड वर्क फ्रॉम होम किंवा ऑफिस अडेंडन्सशी संबंधित नाहीये. कर्मचाऱ्यांचे कामाचे तास रेकॉर्ड करण्याच्या सिस्टमवरून हा दंड ठोठावला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT