Infosys CSR scam: इन्फोसीस सीएसआर निधीचा लाभ देण्याच्या आमिषाने घातला गंडा

तोतया व्यवस्थापकाने संस्थांची केली कोट्यवधीची लूट
fraud
fraudpudhari photo
Published on
Updated on

बंगळूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसीस फाऊंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) निधीचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून तोतया व्यवस्थापकाने काही संस्थांना कोट्यवधी रुपयांना गंडवले आहे. गंडलेल्या संस्थांनी इन्फोसीस व्यवस्थापनाकडे निधीसाठी संपर्क साधल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली आहे. तोतया व्यवस्थापक फरार आहे.

इन्फोसीसने देवनहळ्ळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार 1 सप्टेंबर 2025 ते 20 मार्च 2026 या काळात गगन एन. दीप नावाच्या भामट्याने आपण इन्फोसीस कंपनीच्या सीएसआरचे प्रादेशिक प्रमुख असल्याचा दावा करत अनेक संस्था तसेच कंपन्यांशी संपर्क साधला. इन्फोसीसचे पायाभूत सुविधा, जनसंपर्क आणि सीएसआरचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हर्ष आणि जागतिक पायाभूत सुविधा वरिष्ठ उपाध्यक्ष नीलाद्री प्रसाद मिश्रा या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम केल्याचा दावा गगनने केला. तसेच, सीएसआर निधीतून मदत देण्यासाठी आगाऊ ठेव म्हणून पैशांची मागणी केली.

बंगळूर येथील हेग्गुंजे राजीव शेट्टी चॅरिटेबल ट्रस्टच्या धर्मादाय कार्यात रस असल्याचे भासवून त्यांनाही इन्फोसीसकडून सीएसआर निधी देण्याचे आश्वासन दिले. म्हैसूर मर्कंटाईल संस्थेसह काही संस्थांनी त्याला पैसेही दिले. ही रक्कम कोटीच्या घरात असल्याचे समजते. 30 मार्च रोजी म्हैसूरच्या संस्थेने इन्फोसीसकडे तक्रार करत सीएसआर निधी अद्याप मिळाला नाही, असे सांगितले. त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news