

Infosys Collecting electricity Bills: भारतातील सर्वात मोठ्या आयटी फर्मपैकी एक असलेल्या इन्फोसिसने त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांची वीजेची खपत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचा डेटा मागवला आहे. या डेटामुळे शाश्वत उपक्रमाच्या अंतर्गत क्लीन एनर्जी आऊटपूटवर काय परिणाम झाला आहे याची माहिती मिळणार आहे. कंपनीच्या हायब्रीड वर्क पॉलिसीमुळे कर्मचारी हे त्यांचा बराच काळ हा घरातून काम करताना घालवत आहेत. त्यांना महिन्यातून फक्त १० दिवसच ऑफिसला यावं लागत आहे.
दरम्यान, इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवल्याचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिलं आहे. या ईमेलमध्ये इन्फोसिसचे सीएफओ (चीफ फायनान्स ऑफिसर) जयेश संघराजका यांनी कंपनीने वर्क फ्रॉम होम वीज वापर सर्व्हे सुरू केल्याचं जाहीर करण्यात आलं. त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वेळ काढण्यास सांगितलं गेलं.
या ईमेलमध्ये सीएफओ लिहितात की, 'आपल्या कार्यपद्धतीत हायब्रीड वर्क हा आता अंतर्गत भाग झाला आहे. आपल्या कामामुळे पर्यावरणावर परिणाम होत आहे. वर्क फ्रोम होम देखील इन्फोसिसच्या ग्रीन हाऊस गॅस उत्पादनात भर टाकत आहे. आम्ही याबाबतची आमची रिपोर्टिंग मेथडॉलॉजी अजून चांगली करण्यासाठी आणि सध्याच्या वर्क फ्रॉम होम एनर्जी युसेज अचूक डेटा गोळा करण्यासाठी हे प्रयत्न करत आहोत.'
अधिकाऱ्यांनी सांगितलं की कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद कंपनीला वीज वापरचा परिणाम अचूकपणे मोजता येईल आणि त्या प्रमाणे शाश्वत उर्जेच्या बाबतीत पुढची पावले उचलता येतील.'
बंगळुरूमधील या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जवळपास ३ लाखाहून जास्त कर्मचारी काम करतात. शाश्वत उर्जेची जबाबदारी फक्त जगाची नाही तर ती इतरांची देखील आहे. संघराजका यांनी सांगितले की कंपनी शाश्वत उर्जेबाबत गंभीर आहे. कार्बन न्युट्रलिटीमध्ये कंपनी ग्लोबल टाईमलाईनच्या पुढे आहे. त्यांनी २००८ पासून प्रती व्यक्ती उर्जेची खपत ही ५५ टक्क्यांनी कमी केली आहे. गेल्या वर्षीपासून जवळपास गरजेच्या ७७ टक्के वीज ही शाश्वत उर्जेच्या माध्यामतून मिळवली आहे.