One Person AI Company pudhari
फीचर्स

One Person AI Company: ना ऑफिस, ना टीम! घरात बसून AI च्या जोरावर बेन ब्रोकाने उभी केली ८३ कोटींची कंपनी

Anirudha Sankpal

One Person AI Company Ben Broca: बेन ब्रोका यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात एक कंपनी सुरू केली. त्यांची ही कंपनी नवउद्योजकांना AI टूल्स पुरवते. त्याचे आता १० हजार ग्राहक असून त्यांच्या कंपनीचे उत्पन्न हे वर्षाला जवळपास १० मिलियन डॉलर्सपर्यंत पोहचलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कंपनीत एकही कर्मचारी नाहीये.

४० वर्षाचे बेन हे असे नवउद्योजक आहेत जे त्यांचा कंपनी लाँच करतात आणि ती कंपनी ते स्वतःच चालवतात. आर्टिफिशल इंटेलिजन्स टूल्स हे बेन यांना आलेले इमेलला उत्तर देते, कोड लिहिण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम एआयच करतात. तसेच ग्राहकांकडून आलेली रिक्वेस्ट, नवीन सबस्क्राईबर आणि जर समस्या आली तर रिफंड देखील इश्यू करतात.

बेन ब्रोका यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो स्वतः घेतात. ते हा निर्णय आपल्या घराच्या लिव्हिंग रूममधूनच घेतात. ते म्हणाले की, याचे चांगले रिझल्ट मला मिळालेले आहेत. कधी काळी असा व्यवसाय चालवण्यासाठी एक विशिष्ट टीमची गरज होती. मात्र AI ने ही धारणा मोडून काढली आहे. त्यामुळे अनेक उद्योजक एकटेच कंपनी चालवण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.

दरम्यान, पेमेंट कंपनी स्ट्रीप्सचे विश्लेषण केल्यानंतर या क्षेत्रात हजारो एकटे ऑपरेटर असल्याचं आढळून आलं. या प्लॅटफॉर्मचा वापर करून अनेकजण जवळपास १ मिलियन डॉलरचे उत्पन्न मिळवत आहेत. २०२३ ते २०२५ दरम्यान, एकट्याने कंपनी चावलून आपले उत्पन्न १० मिलियन डॉलर्सच्या पार पोहचवणाऱ्या एकट्या ऑपरेटर्सची संख्या तिप्पट झाली आहे.

स्ट्रीपच्या चीफ इकॉनॉमिस्ट टेडेस्ची यांनी सांगितलं की आधी लोकांना बिजनेस काँटेक्टशिवाय किंवा विशिष्ट क्षेत्रातील व्यक्तीशिवाय त्यांच्या कल्पना सत्यात उतरवणे शक्य नव्हते. मात्र आता AI च्या माध्यामातून तुम्ही बिल्ट इन बिजनेस पार्टनर निर्माण करू शकता.

AI आता विविध व्यवस्थापकीय टास्क हँडेल करू शकतो. त्यामुळं आता एकट्याच्या जीवावर कंपनी लाँच करणे फायद्याचे आणि सोयीचे झाले आहे. विशेष करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात म्हणजे कोडिंग फिल्डमध्ये याचा चांगला फायदा होते.

बँक ऑफ अमेरिका इन्स्टिट्यूट इकॉनॉमिस्ट टेलर बोव्हली यांनी सांगितलं की माहिती क्षेत्रातील नव्या व्यवसायांच्या अर्जांमध्ये ४५ टक्क्याची वाढ झाली आहे. मात्र कर्मचारी हायर्स करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटलं आहे.

जरी हा सेन्सस डाटा सोलो ऑपरेटेड बिजनेस ट्रॅक करत नाहीत तरी ढोबळमानाने आकडेवारी दाखवते की टेक इंडस्ट्रीमधील कर्मचारी हायर करण्याचे अर्ज फारच कमी झाले आहेत. दुसऱ्या क्षेत्रात मात्र याची संख्या वाढली आहे. हे एक सोलो ऑपरेटर्सची संख्या वाढत असल्याचेच लक्षण आहे असे अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT