कोरोनामुळे भारतात ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला. यामुळे मागचे दोन वर्षे या क्षेत्रात मंदीची मोठी लाठ दिसून आली. दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने देशातील सर्वच क्षेत्रात गती यायला सुरूवात झाली आहे. (Hero splendor)
भारतातील नामवंत कंपनी हिरोकडून (HERO) वेगवेगळ्या दोन चाकी BS6 गाड्यांचे लाँचींग करण्यात येणार आहे. हीरोकडून नवीन स्पलेंडर लाँच करण्यात येणार आहे.
मागच्या दोन वर्षात मंदी असुनही सर्वात जास्त विक्री स्पलेंडरची झाली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. हीरोकडून सगळ्याच वाहनांचे BS6 मध्ये लाँचींग करण्यात येणार आहे. यामध्ये स्पलेंडर ही पहिली BS6 प्रमाणपत्र प्राप्त केलेली गाडी असणार आहे. यंदाच्या दिवाळीला स्पलेंडरची सर्वात जास्त विक्री होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हीरो मोटोकॉर्पच्या माहितीनुसार जुलै २०२१ ला इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव टेक्नोलॉजी (ICAT) च्या मान्यतेने स्प्लेंडर iSmart 110 ला BS6 प्रमाणपत्र देण्यात आले. यानंतर हीरोकडून या मॉडेलचे ट्रेनींग सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान या नव्या गाडीच्या लाँचींगबाबत कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही. या गाडीचे बुंकींग पण सुरू करण्यात आले नाही.
हिरो मोटोकॉर्प या वर्षी दिवाळीच्या सुमारास नवीन स्प्लेंडर बीएस 6 लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. परंतु कंपणीकडून याबाबत ठोस तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. कंपनीच्या मते, BS6 च्या लाँचींगबाबात जोरदार तयारी सुरू आहे.