Karizma XMR 250 First Look: हिरो मोटोकॉर्प भारतीय बाजारात अजून एक प्रीमियम बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या लाँच होणाऱ्या बाईकने यापूर्वी देखील भारतीय बाईक विश्वावर अधिराज्य गाजवलं आहे. मिलेनियल्सची ही ड्रीम बाईक म्हणून ओळखली जायची. होय आता हिरो करिज्मा एक्सएमआर २५० भारतीय बाजारात येणार आहे. याचे सध्या टेस्टिंग सुरू असून त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे.
कंपनी भारतीय बाजारात १५० सीसी ते ३५० सीसी प्रीमियम बाईक्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी करिज्मा एक्मएमआर २५० टेस्टिंग करताना दिसली आहे. करिज्मा एक्सएमआर २५० ही कोणत्याही कॅमोफ्लाजशिवाय दिसली आहे. त्यामुळं हा फोटो डीलरशिप सर्व्हिसेस फॅसिलिटीच्या जवळचा असण्याची शक्यता आहे.
Karizma XMR 250 ही काळ्या रंगात दिसली. यात रेड ग्राफिक वर्क केलं आहे. लीक फोटोनुसार ही बाईक प्रोडक्शन रेडी असल्याचं दिसत आहे. बाईक समोरून एका सुपरस्पोर्ट बाईख सारखी दिसत आहे. जशी करिज्माची आधीची कन्सेप्ट होती तशीच ती दिस आहे. यात एख मोठी विंडस्क्रीन देण्यात आली आहे.
बाईकमध्ये ट्विट एलईडी डीआरएल्स, सेंट्रली माऊंटेड प्रोजेक्टर हेडलँपच्या जवळ हे डीआरएल्स दिले आहेत. करिज्मा च्या फयरिंगवर विंगलेट्स आणि बारीक एलईडी इंडिकेटर्स आहेत. यात गोल्डन युएसडी फ्रंट फोर्क दिला आहे. यामुळं गाडीच्या सौंदर्याला चार चांद लागत आहेत.
हिरो करिज्मा एक्सएमआर २५० डिझाईन पाहिलं तर कंपनी एक स्पोर्टी लूक घेऊन ही बाईक मार्केटमध्ये उतरवणार आहे. यात मस्क्युलर फ्युअल टँक, एक्सएमआर ग्राफिक्स क्सिप ऑन हँडलबार आणि स्प्लिट सीट मिळणार आहे. याची रायडिंग पोजिशन हे स्पोर्टी आणि डेली कम्युटर दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन तयार केली आहे.
करिज्म एक्सएमआर २५० हिरोचे नवीन २५० सीसीचे सिंगल सिलेंडर इंजीन असणार आहे. हे डीओएचसी, लिक्विड कूल्ड इंजिन असणार आहे. हे इंजीन एक्स्ट्रीम २५० आर मध्ये मिळतं. हे इंजीन ३० एचपी पॉवर आणि २५ एनएम टॉर्क प्रोड्युस करते. यात ६ स्पीड गिअरबॉक्स आहे. तसेच यात प्री लोडेड एडजस्टेबल रियर मोनोशॉक, फ्रंट आणि रेयर डिस्क ब्रेक तसेच ड्युअल चॅनल एबीएस सारखे फीचर मिळणार आहेत.
कंपनी या बाईकमध्ये स्विचेबल एबीएस फीचर देखील देण्याची शक्यता आहे. हा फीचर एक्स्ट्रीममध्ये मिळतो. यात फूल एलईडी लाईटिंग, डिजीटल इन्ट्रूमेंट कंसोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेविगेशन सपोर्ट, लॅप टाईमर, ड्रॅग टायमर, एडजस्टेबल क्लिप ऑन हँडलबार आणि युएसबी चार्जिंग सारखे फिचर देखील मिळणार आहेत.