पुणे : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात साथीच्या आजारामुळे आणि परिणामी लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे लहान मुलांचे बाहेर जाणे आता कमी झाले आहे. या साथीचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला आहे. पूर्वीची मुलं लपाछपी, पकडा-पकडी यांसारखे खेळ खेळायची. पण कोरोनाच्या काळात मोठ्यांसोबतच लहान मुलांसाठीही वातावरणात खूप बदल झाला आहे. सध्या लहान मुलं डिजिटल स्क्रीनसमोर बसून ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेतात. ते त्यांच्या मित्रांनाही पडद्यावरूनच भेटतात. त्यामुळे हिरो कंपनीने लहान मुलांसाठी डोरेमॉन, जिमी आणि जॉर्डन ही कार्टून्सची नावे असलेल्या सायकली लॉन्च केल्या आहेत.
सायकल चालवल्याने मुले दीर्घकाळ ऊर्जावान राहू शकतात. हे लक्षात घेऊन हिरो सायकल्सने लहान मुलांसाठी एक सायकल लाँच केली आहे. या सायकलला डोरेमॉन, जिमी आणि जॉर्डन या कार्टून्सची नावे देण्यात आली आहेत. यामुळे मुलं सायकल चालवण्याचा आनंद घेऊ शकतात आणि सायकलच्या निवडी आणि आकारानुसार सामाजिक अंतर पाळू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की मुलांसाठी सायकल लॉन्च करण्याचा उद्देश हा आहे की मुले सायकल चालवतानाही घराबाहेर मास्क लावून आरामात श्वास घेऊ शकतील.
पुण्यात शिवसैनिकांकडून हल्ला; किरीट सोमय्या भाजप नेत्यांसह चौकशीच्या मागणीसाठी थेट दिल्लीत पोहोचले !
हिरो मोटर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष पंकज एम मुंजाल, म्हणाले, "कोविड-19 साथीच्या आजारामुळे, आम्हा सर्वांना घरीच राहावे लागले. हळूहळू आम्हाला कळले की आम्हाला या सायकलची गरज आहे. विषाणूंसोबत जगण्यासाठी, शक्य तितके सुरक्षित राहिले पाहिजे. या साथीच्या आजारात मुले त्यांच्या बालपणातील खेळणे विसरली आहेत. यामुळे हिरो सायकल्सने मुलांना त्यांचे बालपण टिकवून ठेवण्यास मदत केली आहे. म्हणूनच नवीन सायकल लॉन्च केली आहे. ही सायकल हिरो स्प्रिंट जिमी, हिरो स्प्रिंट जॉर्डन आणि हिरो एक्स डोरेमॉन या नावाने उपलब्ध आहे. हे सर्व रेंज ट्रांझिशन-अँटी-कॉरोझन प्रोटेक्शन आणि अँटी-पिंच ब्रेकिंग सिस्टीम सारख्या अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यांसह मिळत असून, या नवीन सायकलीमध्ये मुलांच्या सुरक्षितेची परिपूर्ण काळजी घेतली आहे. यामुळे मुलांना घराबाहेरही चांगला वेळ घालवता येणार आहे.
हिरो सायकल्सने सुरुवातीला हिरो स्प्रिंट जिमी आणि हिरो स्प्रिंट जॉर्डन कलेक्शन लाँच केले आहे. या कलेक्शनमध्ये सायकल चालवताना मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी रेट्रो-फिट केलेल्या नवीन-डिझाइन अँटी-बॅक्टेरियल हँडल ग्रिप्स आहेत. यानंतर, मुलांना सायकलिंगचा अधिक पर्याय देण्यासाठी कंपनीने हिरो एक्स डोरेमॉन लाँच केली आहे. डोरेमॉन हे अतिशय लोकप्रिय अॅनिमेटेड पात्र आहे, हे लक्षात घेऊन सायकलला हे नाव देण्यात आले. या सायकली अँटी-पिंच ब्रेकिंग सिस्टीम व्यतिरिक्त, बाइक्स पीएच-फ्री सॅडल्स सपोर्ट करतात आणि युरोपियन युनियन मानकांनुसार डिझाइन केल्या आहेत. या तिन्ही सायकलच्या स्लीक आणि क्लीन डिझाईनमुळे मुलांना सुरळीत आणि सुरक्षित राइड मिळेल.
मुंजाल यांनी पुढे असेही सांगितले, "सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळताना निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी सायकल चालवणे हा सर्वात उत्तम आणि सोयीचा मार्ग आहे. सायकल ही मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहे; कारण मुलांना सायकल चालवताना खूप मजा येते. सायकल चालवणे लहान मुलांच्या वाहतुकीसाठी सर्वात सुरक्षित मार्ग आहे. यामुळे पर्यावरण दूषित होत नाही. सायकल चालवल्याने सर्व चालकांना अनेक फायदे होतात. जसे की हृदयाचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात, संधिवात थेरपी चांगली कार्य करते आणि वजन कमी होते. त्यामुळे जर आपण मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये सायकल चालवण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन दिले, तर आपण एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्यात खरोखर योगदान देऊ शकू.