Gen Z Productivity Guilt pudhari
फीचर्स

Productivity Guilt: Gen Z मध्ये वाढतोय प्रोडक्टिव्हिटी गिल्ट... आराम करतानाही ते का असतात अस्वस्थ?

जेन झींमध्ये असा प्रोडक्टिव्हिटी गिल्टचा विचार सध्या ट्रेंड करत आहे.

Anirudha Sankpal

Productivity Guilt : आज धकाधकीच्या आयुष्यात रिकामटकडे बसणे तरूणांसाठी शक्य नाही. ऑफिस किंवा घरात आराम करत बसणे, चित्रपट पाहणे, असंच पडून राहणं या ऐवजी त्यांच्या मनात काही तरी काम करता आलं असतं असं विचार येतो. सोशल मीडियावर इतर तरूण अभ्यास करताना, नोकरी करताना आणि काम करताना पाहून त्यांना देखील आपण आपला वेळ वाया घालवतोय का असा विचार येणं सहाजिक झालं आहे. या विचाराला प्रोडक्टिव्हिटी गिल्ट असं म्हटलं जातं.

आराम करतानाही अस्वस्थ

जेन झींमध्ये असा प्रोडक्टिव्हिटी गिल्टचा विचार सध्या ट्रेंड करत आहे. त्यांच्यावर प्रोडक्टिव्ह राहण्याचा दबाव आहे. आज तरूणांना नोकरी शिक्षण यासोबतच नवीन स्कील्स देखील शिकले पाहिजे. फिटनेसवर लक्ष दिलं पाहिजे. आपलं करिअर पुढं घेऊन गेलं पाहिजे. त्यामुळं थोडा जरी वेळ ते रिकामे बसले तरी त्यांना आपण पाठीमागे तर राहणार नाही असा गिल्ट निर्माण होतो.

संशोधन काय सांगते?

सप्टेंबर - ऑक्टोबर २०२५ मध्ये जर्नल ऑफ कॉलेज स्टुडंट डेव्हलपमेंटमध्ये एक रिसर्च पब्लिश झाला. यात २८० कॉलेज स्टुडंट सामील झाले होते. या संशोधनात असं दिसून आलं की विद्यार्थी आराम करणे हे आपला अभ्यास आणि काम यासाठी महत्वाचे मानतात. मात्र ज्यावेळी ते काम सोडून आराम करतात त्यावेळी त्यांना सतत गिल्टी वाटत असतं.

संशोधनानुसार काम अर्धवट राहिलं आहे याची चिंता, अभ्यास नोकरी आणि दुसऱ्या जबाबदाऱ्या आराम करण्यामध्ये अडथळा निर्माण करत असतात. विद्यार्थ्यांना थकवा, डोकेदुखी आणि डोळे जळजळणे यानंतर आता ब्रेक गरजेचा आहे असं वाटतं.

प्रत्येकवेळी प्रोडक्टिव्ह असणं गरजेचं नाही

सतत काम करण्याने तुम्ही यशस्वी व्हाल याची शाश्वती नसते. शरीर आणि मेंदूला आराम देणे तितकेच गरजेचे असते. निवांत बसणे हे कायम वेळेचा अपव्य नसतो. कधी कधी स्वतःसोबत वेळ घालवणे देखील गरजेचे असते. जेन झींना आयुष्यात प्रत्येक घडीला काही मिळवणे गरजेचे नसते. आराम करणे हा आळशीपणा नाही तर ती एक गरज असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT