Work From Home pudhari
फीचर्स

Work From Home: कंपनीनं वर्क फ्रॉम होमवर घातली पूर्ण बंदी... Gen Z कर्मचाऱ्यानं एका संध्याकाळी असं काही केलं की नियमच बदलला

Anirudha Sankpal

Work From Home Gen Z : कॉर्पोरेट जगतात जेन झी फक्त ऑफिसमध्ये बसून सांगितलेलं काम करत नाहीयेत तर कामाच्या बाबतीत नवे नियम देखील बनवत आहेत. चांगल्या नोकरीसोबत कायम प्रत्येकवेळी कामासाठी उपलब्ध रहावं लागणार ही अपेक्षा देखील जोडली गेलेली असते. त्यामुळं रात्री उशिरा मेसेज, महत्वाचे कॉल आणि ऑफिसची वेळ संपल्यानंतरही छोटी कामे करणे ही सर्वसाधारण बाब मानली गेली आहे. मिलेनियल्सच्या हे अंगवळणी पडलं आहे.

मात्र एखादा कर्मचारी कंपनीनेच घालून दिलेले नियम अत्यंत काटेकोरपणे पाळायला लागला तर काय होणार... मुंबईचे सीए पारस गंगवाल यांनी सोशल मीडियावर एक असंच प्रकरण शेअर केलं आहे. यात एका जेन झी कर्मचारी रोहितने आपल्या कंपनीचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळत पूर्ण व्यवस्थेवर कसं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

काय आहे नेमकं प्रकरण?

एक्स पोस्टनुसार, कर्मचाऱ्याने नुकतेच एका कंपनीत काम करणं सुरू केलं होतं. या कंपनीत व्यवस्थापनानं पहिल्याच दिवशी एक गोष्ट स्पष्ट केली होती. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम मिळणार नाही. कर्मचाऱ्यांनी याबाबत कोणताही वाद घालू नये.

नियमाचं काटेकोर पालन

या कर्मचाऱ्याने याचा विरोध न करत त्याचं काटेकोर पालन करण्याचं ठरवलं. तो दररोज ऑफिसच्या वेळेत यायचा. आपलं काम संपवून ऑफिस सुटण्याच्या वेळेत कार्यालयातून बाहेर जायचा. तो आपलं पूर्ण काम इमानदारीनं करत होता. त्याने कोणताही प्रश्न व्यवस्थापनाला विचारला नाही. सर्व काही सामान्य सुरू होतं. मात्र एका संध्याकाळी या कर्माचाऱ्यानं असं काही केलं की ऑफिसला आपला नियम बदलावा लागला.

त्या रात्री नेमकं काय घडलं?

एका रात्री ८ वाजता कर्मचाऱ्याला एका क्लाइंटचा एक मेसेज आला. मात्र कर्मचाऱ्याने या मेसेजला उत्तर न देण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी मॅनेजरने त्या कर्मचाऱ्याला मेसेजकडे का दुर्लक्ष केलं असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्याने शांतपणे मॅनेजरला असं उत्तर दिलं की त्याला देखील विचार करणं भाग पडलं. रोहितनं सांगितलं की सर मला वाटलं की ऑफिसचे कामाचे तास संपल्यानंतर घरातून त्या मॅसेजला उत्तर देणं हे वर्क फ्रॉम होम मानलं गेलं असतं. आपल्या कंपनीत हे पूर्णपणे बॅन आहे. रोहितनं शांतपणे दिलेलं उत्तर खरं तर खूप तिखटं होतं.

या कर्मचाऱ्याने कंपनीचा कोणताही नियम मोडला नाही. त्याने तर कंपनीचा नियम काटेकोरपणे पाळला. या पोस्टवरून जेन झी हे थेट विरोध करत नाहीत. मात्र नियमांचाच वापर करून मर्यादा स्पष्टपणे सांगतात. कधी कधी काही न बोलता नियमात राहून देखील विरोध करता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT