नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. आदिशक्तीचा हा उत्सव भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवातील महत्त्वाची असलेली श्री देवीची आरती.
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणांते वारी
हारी पडलो आता संकट निवारी ॥1॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥धृ॥
त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडिले प्रवाही
ते तु भक्तालागी पावसी लवलाही
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥१॥
प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥२॥
हेही वाचलं का?