Samosa Vadapav New Rules pudhari
फीचर्स

Samosa Vadapav New Rules: भारतात समोसा, वडापाव विक्री नियमात झालेत मोठे बदल; दुकानदारांची एक चूक, होणार कायदेशीर कारवाई

Anirudha Sankpal

Samosa Vadapav Packaging New Rules: भारतात समोसा, वडापाव विक्री करण्यासमध्ये एक मोठा बदल झाला आहे. जर एखाद्या दुकानदाराने नव्या नियमाप्रमाणे विक्री केली नाही तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आता वडापाव किंवा समोसा सारखे पदार्थ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना खाण्याचे हे पदार्थ वर्तमान पत्राच्या कागदातून देता येणार नाहीयेत.

मुंबईतील घटनेतून धडा

मुंबईमध्ये एक घटना घडली होती त्यानंतर याबाबतचे नियम कडक करण्यात आले आहेत. मुंबईत एक वडापाव विक्रेता आपल्या ग्राहकांना वर्तमानपत्राच्या कागदातून खाद्यपदार्थ पॅक करून देत होता. त्यानंतर FSSAI च्या पश्चिम विभागाच्या टीमने आणि बीएमसीने संयुक्त कारवाई केली होती. यानंतर इतर राज्यांना देखील कडक निर्देश देण्यात आले आहेत.

नव्या आदेशानुसार हा नियम छोट्या हातगाडीपासून मोठ्या हॉटेलधारकांपर्यंत सगळ्यांना लागू करण्यात आला आहे. तसेच क्लाऊड किचन, कॅटरर्स आणि सर्व फेरीवाल्यांना देखील हा नियम लागू असणार आहे. आता कोणताही दुकानदार खाद्य पदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात गुंडळून देणार नाही. तसेच समोसा आणि वडा यांचे अतिरिक्त तेल शोषूण घेण्यासाठी किंवा अन्नपदार्थ झाकून ठेवण्यासाठी देखील वर्तमानपत्राचा वापर करता येणार नाही

वर्तमानपत्राचा कागद एवढा घातक का?

जाणकारांच्या मते वर्तमानपत्राच्या छपाईत वापरण्यात येणारी शाईमध्ये अनेक रासायनिक घटक आहेत. त्यात धातू देखील असतात. यात शीसं देखील असतं. गरम अन्नपदार्थाच्या संपर्कात ही शाई आली की त्यातील घटक अन्नपदार्थात मिसळले जातात. त्यामुळं आरोग्य धोक्यात येतं. तसेच वर्तमानपत्र अनेक अस्वच्छ ठिकाणांवरून आलेला असतो. त्यामुळं बॅक्टेरिया आणि रोग पसरवणारे किटाणू त्यात असू शकतात.

FSSAI ने स्पष्ट केलं की आता फक्त फूड ग्रेड पॅकेजिंग सामुग्रीच वापरण्यात यावी. राज्यांना याबाबत कडक धोरण अवलंबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT