Chinese Bhel Recipe file photo
मेजवानी

Chinese Bhel Recipe: बाहेरची चायनीज भेळ विसरा! घरच्या घरी बनवा १४ ग्रॅम प्रोटीन असलेली ही स्पेशल रेसिपी; वजनही वाढणार नाही!

चायनीज भेळची एक अशी 'हेल्दी' रेसिपी शेअर केली आहे, जी चवीला उत्तम तर आहेच, शिवाय त्यात प्रथिनांचे प्रमाणही भरपूर आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chinese Bhel Recipe

मुंबई: बाहेरचे चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा तर सर्वांनाच असते, पण आरोग्याच्या काळजीपोटी अनेकदा आपण मन मारतो. विशेषतः 'चायनीज भेळ' म्हटलं की तळलेले नूडल्स आणि कॅलरीज डोळ्यासमोर येतात. मात्र, आता फिट राहण्यासाठी जिभेचे चोचले पुरवणे बंद करण्याची गरज नाही. सोशल मीडियावरील प्रसिद्ध फिटनेस इन्फ्लुएन्सर वंशिका खुराणा हिने चायनीज भेळची एक अशी 'हेल्दी' रेसिपी शेअर केली आहे, जी चवीला उत्तम तर आहेच, शिवाय त्यात प्रथिनांचे प्रमाणही भरपूर आहे.

वंशिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भेळ तळण्याऐवजी 'एअर फ्राय' करून बनवली जाते. "याला मी चायनीज भेळ म्हणण्यापेक्षा 'सॅलड' म्हणणे जास्त पसंत करेन. कारण ही भेळ न तळताही तितकीच कुरकुरीत लागते आणि एका सर्व्हिंगमध्ये केवळ २४९ कॅलरीज असून १४ ग्रॅम प्रोटीन मिळते," असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे. प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी तिने यात सोया नूडल्स आणि टोफूचा वापर केला आहे.

साहित्य:

सोया नूडल्स: ६० ग्रॅम (हाय प्रोटीन)

टोफू: १२० ग्रॅम

भाज्या: कोबी, गाजर, सिमला मिरची (बारीक चिरलेली)

मसाले व इतर: तेल स्प्रे, चवीनुसार मीठ, मिरी पूड, १ चमचा कॉर्नफ्लोअर, १ चमचा तीळ.

सॉससाठी: १ मोठा चमचा शेजवान चटणी, १.५ चमचा सोया सॉस, १-२ चमचे टोमॅटो केचअप.

बनवायची कशी?

१. सर्वप्रथम नूडल्स मिठाच्या पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्या.

२. नूडल्सवर थोडे तेल स्प्रे करून १८० डिग्री सेल्सिअसवर ८ ते १० मिनिटे एअर फ्रायरमध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

३. टोफूचे बारीक तुकडे करून त्यात मीठ, मिरी आणि कॉर्नफ्लोअर मिसळा. त्यावर थोडे तेल स्प्रे करून १८० डिग्रीवर १० ते १२ मिनिटे एअर फ्राय करा.

४. एका पॅनमध्ये तीळ आणि सर्व चिरलेल्या भाज्या हाय फ्लेमवर २-३ मिनिटे परतून घ्या. भाज्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहील याची काळजी घ्या.

५. एका बाऊलमध्ये शेजवान चटणी, सोया सॉस आणि केचअप एकत्र करा. आता पॅनमध्ये तयार केलेले कुरकुरीत टोफू, नूडल्स आणि सॉस घालून सर्व मिश्रण नीट एकत्र करा.

६. तुमची हाय-प्रोटीन चायनीज भेळ तयार आहे! कुरकुरीत असतानाच ती खाण्याचा आनंद घ्या.

टीप: ही माहिती सोशल मीडियावरील उपलब्ध माहितीवर आधारित आहे. कोणत्याही अधीक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT