Gemini AI For Free College Admission: दर वर्षी लाखो विद्यार्थी हे SAT ची तयारी करत असतात. त्या आधारेच अमेरिकेत मुलांना प्रवेश मिळतात. आता गुगल Gemini AI कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांना मदत करणार आहे. Gemini आता विद्यार्थ्यांना SAT च्या तयारीत मदत करणार आहे. याबाबतची माहिती Google CEO सुंदर पिचाई यांनी दिली आहे.
सुंदर पाचाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून विद्यार्थांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी आता विद्यार्थी SATs ची तयारी पूर्णपणे मोफत करू शकणार आहे. त्यासाठी त्यांनी The Princeton Review सोबत भागीदारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचा कंटेट आपण वापरू शकता.
सुंदर पिचाई हे आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, 'SAT ची तयारी आजपासून सुरू होत आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात यामध्ये टेस्ट देखील समाविष्ट करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार इथं पूर्ण प्रॅक्टिस सेट मिळणार आहे. तुम्ही इथं तुमच्या टेस्टचा निकाल आणि फिडबँक देखील पाहू शकता.
Gemini च्या या अपडेटसोबत विद्यार्थ्यांना संपूर्ण प्रॅक्टिस पेपर मिळणार आहे. इथं त्वरित फिडबॅक आणि स्कोअर दिसणार आहे. त्याचबरोबर गरज पडली तर प्रश्न सोडवण्याची सुविधा देखील दिली जाईल.
जर तुम्हाला कोणता प्रश्न कळला नाही तर Gemini त्या कॉन्सेप्टला स्टेप बाय स्टेप समजून घेण्यास मदत करणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने उत्तर अंदाजे दिले असेल आणि ते योग्य निघालं असेल तरी AI या उत्तराचे पूर्ण लॉजिक समजून सांगणार आहे.
यामुळे ही कॉन्सेप्ट समजण्यास अधिक मदत होते. Gemini ने आता फक्त SAT प्रॅक्टिस टेस्टचा समावेश केला आहे. सुंदर पिचाई यांनी येणाऱ्या काही दिवसात अजून परीक्षा देखील याच्याशी जोडल्या जातील असं सांगितलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.