Google Jobs Pudhari
एज्युदिशा

Google Jobs: Googleमध्ये नोकरीची मोठी संधी! फ्रेशर्सचा पगार वाचून थक्क व्हाल; जाणून घ्या A टू Z माहिती

Google Jobs: Google Careers वरून अर्ज केल्यानंतर उमेदवारांना टेस्ट आणि मुलाखतींच्या विविध फेऱ्यांना सामोरे जावे लागू शकते.

Rahul Shelke

How to Get a Job at Google: जगातील आघाडीची टेक कंपनी Googleमध्ये नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. उत्तम वर्क कल्चर, आकर्षक पगार आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध सुविधा यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार Google मध्ये नोकरीसाठी अर्ज करतात. मात्र, चांगली तयारी आणि कौशल्यांचा अभाव असल्याने अनेकांना निवड प्रक्रियेत यश मिळत नाही.

तुम्हीही Google मध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल, तर अर्ज करण्यापासून ते मुलाखतीपर्यंतची प्रक्रिया कशी असते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Resume ठरतो महत्त्वाचा

Google मध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी व्यवस्थित Resume तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Resume मध्ये अनावश्यक माहिती देण्यापेक्षा तुमची कौशल्ये, अनुभव, प्रोजेक्ट्स ठळकपणे मांडणे गरजेचे आहे.

विशेषतः टेक्निकल पदांसाठी Computer Science किंवा संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता आणि तांत्रिक कौशल्यांना महत्त्व दिले जाते. B.E./B.Tech (Computer Science), MCA तसेच काही पदांसाठी B.Sc./M.Sc (Computer Science) यांसारख्या पदव्या उपयुक्त ठरू शकतात. मात्र, केवळ पदवीपेक्षा संबंधित कौशल्ये आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभवही महत्त्वाचा असतो.

Google मध्ये Hiring Process कशी असते?

Google मध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया साधारणपणे पुढीलप्रमाणे असते:

  • सर्वप्रथम Google Careers या अधिकृत प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्या पात्रतेनुसार Job Role शोधावा.

  • इच्छित पदासाठी अर्ज करून Resume अपलोड करावा.

  • Resume शॉर्टलिस्ट झाल्यास भरती करणाऱ्या टीमकडून पुढील प्रक्रियेसाठी संपर्क केला जाऊ शकतो.

  • पदाच्या स्वरूपानुसार Coding Test, Technical Assessment किंवा इतर प्रकारच्या चाचण्या घेतल्या जाऊ शकतात.

  • त्यानंतर उमेदवाराला एकापेक्षा अधिक मुलाखतींच्या फेऱ्यांना सामोरे जावे लागू शकते.

  • Technical Skills सोबतच Problem Solving, Communication, Teamwork आणि Leadership यांसारख्या गुणांचाही विचार केला जातो.

Networking आणि Referral ठरू शकते फायदेशीर

नोकरीच्या शोधात Networking देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकते. Google मध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तीशी व्यावसायिक पातळीवर संपर्क असल्यास संबंधित Job Role आणि कंपनीच्या Hiring Process विषयी माहिती मिळू शकते.

कंपनीतील कर्मचारी पात्र उमेदवारासाठी Referral देऊ शकतो. मात्र, Referral म्हणजे थेट नोकरीची हमी नसून उमेदवाराच्या प्रोफाइलला प्रक्रियेत पुढे जाण्याची संधी मिळू शकते.

Shortlist झाल्यानंतरही खरी परीक्षा

Resume शॉर्टलिस्ट होणे म्हणजे नोकरी निश्चित होणे नव्हे. त्यानंतर मुलाखतींच्या विविध फेऱ्यांमध्ये उमेदवाराच्या तांत्रिक ज्ञानासोबतच समस्या सोडवण्याची क्षमता, निर्णयक्षमता, संवादकौशल्य आणि टीममध्ये काम करण्याची पद्धत तपासली जाऊ शकते.

कठीण परिस्थितीत उमेदवार कसा विचार करतो आणि समस्येवर कशाप्रकारे तोडगा काढतो, यालाही महत्त्व दिले जाते. त्यामुळे फक्त अभ्यास करून पुरेसे नसून प्रत्यक्ष परिस्थितीवर आधारित प्रश्नांची तयारी करणेही आवश्यक आहे.

Google मध्ये फ्रेशर्सना किती पगार मिळतो?

Google मधील पगार हा Job Role, कौशल्ये, अनुभव, स्थान आणि नियुक्तीच्या अटींनुसार बदलू शकतो. उपलब्ध माहितीनुसार, काही टेक्निकल फ्रेशर्सना वार्षिक सुमारे 15 ते 40 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. तसेच इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा सुमारे 50 हजार ते 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा वेगळा स्टायपेंड मिळू शकतो. मात्र, हे आकडे सर्व पदांसाठी नसून कंपनी, पद, ठिकाण आणि भरतीच्या पॅकेजनुसार बदलू शकतात.

Google मध्ये नोकरी मिळवण्यासाठी केवळ पदवी पुरेशी नाही. चांगला Resume, कौशल्ये, संबंधित प्रोजेक्ट्स, Problem Solving क्षमता, मुलाखतीची तयारी आणि प्रभावी Communication Skills यांचा फायदा होतो. त्यामुळे फ्रेशर्सनी सुरुवातीपासूनच कौशल्यविकासावर भर देणे आणि संबंधित Job Roles साठी सातत्याने तयारी करणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT