Maharashtra CET Result pudhari photo
एज्युदिशा

CET CAP Round 2026 : सीईटी-कॅप प्रवेशाची धावपळ आता झाली सोपी

तुमच्या जिल्ह्यातच सुरू झाली 'विद्यार्थी मदत केंद्र' सुविधा; नोंदणीपासून प्रवेश निश्चितीपर्यंत सर्व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

पुढारी वृत्तसेवा

कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) अधिक सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थ्यांकडे उच्च शिक्षण विभाग राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell) महाराष्ट्र विद्यार्थ्यांसाठी मदत केंद्रे सुरू केली आहेत. आता प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील कोणतीही अडचण असल्यास विद्यार्थ्यांना आपल्या जिल्हयातच प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळणार आहे. शहराबरोबरच दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेचा लाभ सहज मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

उच्च शिक्षणाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी आणि केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (CAP) अधिक सुलभ, पारदर्शक आणि विद्यार्थ्यांकडे करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State CET Cell) राज्यभर विद्यार्थी मदत केंद्रे (Student Assistance Centres) सुरू केली आहेत. या केंद्रामार्फत प्रत्येक टप्प्यावर प्रत्यक्ष मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे.

ऑनलाईन नोंदणी, अर्ज भरणे, प्रवेशपत्र डाऊनलोड, कागदपत्र पडताळणी, प्रवेश प्रक्रिया संदर्भातील नियंत्रण, शुल्क, पडताळणी, आरक्षण, समुपदेशन तसेच तक्रार निवारण यांसारख्या सर्व बाबींमध्ये प्रशिक्षित अधिकार्‍यांकडून विद्यार्थ्यांना मदत केली जाईल.

१. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, कृषी, वास्तुकला आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लाभ.

विद्यार्थी सीईटी आणि कॅप प्रक्रियेत सहभागी होतात, मात्र अर्ज प्रक्रिया, प्रमाणपत्र निर्मिती, कागदपत्र पडताळणी किंवा तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. नव्या सहाय्य केंद्रांमुळे या अडचणींवर जिल्ह्यास्तरावर मार्ग काढता येणार आहे.

२. केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांना सीईटी व कॅप प्रक्रियेची माहिती, प्रवेश शुल्काबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच पेमेंट गेटवे, दस्तऐवज अपडेट करणे, अर्ज शुल्क भरणा, प्रवेश पत्रातील चुका-सुधारणे यांसारख्या निवारणवली करण्यात येणार आहे.

३. सीईटी कक्ष, परीक्षा केंद्र आणि जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमधील समन्वयाने अधिक प्रभावी करण्यासाठी या केंद्राची मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण, आवश्यकतेनुसार संबंधित अधिकार्‍यांकडे पाठपुरावा आणि प्रवेश निश्चितीपर्यंतच्या शंकेचे निरसन करण्याची सेवा या केंद्रामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

लक्षात ठेवा!

उर्वरित जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी मदत केंद्रे सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर असून ती कार्यान्वित होताच माहिती www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.

काय मिळणार सुविधा?

१. सीईटी परीक्षा व सीएची प्रवेश प्रक्रियाबाबत माहिती व मार्गदर्शन

२. अर्ज भरणे, शुल्क भरणा, कागदपत्रे अपलोड करणे आणि प्रवेशासाठी संबंधित सहाय्य

३. विद्यार्थ्यांच्या शंका व तक्रारींचे निवारण; विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती व पात्रता मार्गदर्शन

४. सीईटी आणि सीईपी पोर्टलशी संबंधित तांत्रिक मदत

५. पेमेंट गेटवे, दस्तऐवज अद्ययावत करणे व इतर तांत्रिक अडचणींचे निरसन - इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT