स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीमधील संधी File Photo
फीचर्स

स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीमधील संधी

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सौरभ जोशी

पर्यावरण संवर्धनासाठी परिपूरक अशा अभ्यासक्रमांचा अंतर्भाव असणे नितांत गरजेचे आहे. करिअरला आपलंसं मानणाऱ्या नव्या युगातील नवयुवकांसाठी आता पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रात पर्यावरणाचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. Education And Career

कधी कधी नव्या गोष्टींची कास धरत असताना काही जुन्या गोष्टींचा -हासही होत असतो. अर्थातच, सध्या भारत औद्योगिकीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत असताना, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने मात्र माघारी पावले फिरताना दिसत आहेत. अशावेळी अर्थकारणास महत्त्व देत असताना, पर्यावरणासही अर्थ प्राप्त करून देण्याची गरज असते आणि म्हणूनच एखाद्या देशाच्या विकासासाठी त्या देशातील शैक्षणिक प्रगती मोठा हातभार लावत असते.

सध्या देशासह जगात होत असलेल्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवर अरिष्ट संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी पर्यावरणाशी दाट नातं असलेल्या निसर्गप्रेमींमध्ये विविध कल्पना दडलेल्या असतात. या कल्पनांना अभ्यासाची जोड देत वाढत्या प्रक्षणावर उत्तर शोधणारी विद्याशाखा आता पर्याय म्हणून उभी आहे. Education And Career

पारंपरिक अभियांत्रिकी शाखा आणि त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये पर्यावरण अभियांत्रिकी शाखेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात कोणतीही कसरत करावी लागत नाही. शिवाय, शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांना जीवघेण्या स्पर्धेस सामोरे जाण्याची गरज भासत नाही. कारण, विविध कार्यक्षेत्रे पर्यावरणाशी संबंधित असल्यामुळे पर्यावरण अभियंत्यांची गरज भासत आहे.

विविध औद्योगिक क्षेत्रांसोबत शासकीय, निमशासकीय संस्था, नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही यासंदर्भात करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. पर्यावरण अभियंत्याच्या अचूक भूमिकेमुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या अनेक पर्यावरणाच्या प्रश्नांची तीव्रता कमी होण्यास निश्चितच मदत होऊ शकते.Education

लोकलपासून ग्लोबलपर्यंत पर्यावरणासंदर्भातील गंभीर प्रश्नांवर चर्चा करत त्यावर उत्तरे शोधली जाऊ पर्यावरणाविषयक संघटना येत असतात. आंतरराष्ट्रीय त्यामुळे नव्या युगाचा व्यापक कल्पक आणि डोळस विचार करणाऱ्या विद्याथ्यांसाठी पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्र आपल्या करिअरची उंची निश्चित करणारे ठरू शकते.Education And Career

१) आज स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये शिकून तयार झालेला विद्यार्थी हा बेरोजगार राहू शकत नाही; कारण आज जवळपास प्रत्येक कंपनीमध्ये पर्यावरण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची गरज ही विविध पदांसाठी आहे आणि हे ओळखूनच भारत सरकारनेसुद्धा आज प्रत्येक कंपनीमध्ये असा नियमच केला आहे.

२) आज शासन अनुमतीनुसार स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीचा दर्जा हा स्थापत्य अभियांत्रिकीशी समकक्ष असल्यामुळे पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये शिकून तयार झालेला विद्यार्थी स्थापत्य अभियांत्रिकीसाठी उपलब्ध असलेल्या जागांसाठीही काम करू शकतो.

यासोबत इतर क्षेत्रांमध्येसुद्धा स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकीमधून पदवी मिळवलेले विद्यार्थी काम करू शकतात. आज देशातल्या अनेक नामवंत उद्योग समूहांमध्ये, शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये आणि खासगी क्षेत्रांमध्ये, पर्यावरण अभियांत्रिकीमधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी असंख्य अशा संधी उपलब्ध आहेत, जिथे हे विद्यार्थी काम करू शकतात आणि चांगला रोजगार मिळवू शकतात.Education And Career

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान यासारख्या देशांमध्ये पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रात विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. भारतातही केंद्र सरकारकडून राबवलेल्या पर्यावरणविषयक विविध योजनांमुळे या क्षेत्राची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यामुळे देशातील पर्यावरणस्नेही विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे ओघ वाढताना दिसत आहे. स्थानिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध खासगी व सरकारी संस्थांमध्ये नोकरीच्या संधी, स्पर्धा परीक्षांमधून केंद्रीय व राज्य शासकीय खात्यांमध्ये सुवर्णसंधींचा फायदा घेत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विदेशातील महाविद्यालयांमध्येही विद्यार्थी प्रवेश करू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT