रोजच्या धावपळीच्या जीवनात स्वयंपाकघरातील कामं लवकर आणि कमी वेळेत पूर्ण झाली तर किती बरं होईल, असं प्रत्येकाला वाटतं. भाज्या चिरण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत आणि नंतर किचनची साफसफाई करण्यापर्यंत अनेक कामं असतात. काही कामं तर खूप वेळखाऊ आणि कंटाळवाणी वाटतात.
आज आपण अशाच काही सोप्या आणि प्रभावी किचन हॅक्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या स्वयंपाकघरातील कामांना खूप सोपं बनवतील. यामुळे तुमचा वेळ तर वाचेलच, पण जेवण बनवताना मजाही येईल.
दही वापरताना: जेव्हा तुम्ही ग्रेव्हीमध्ये दही वापरता, तेव्हा गॅस मंद ठेवा आणि दही घातल्यावर ग्रेव्हीला उकळी येईपर्यंत ढवळत राहा. उकळी आल्यावरच मीठ घाला. यामुळे दही फाटत नाही आणि भाजी चविष्ट होते.
लिंबाचे साल: लिंबू वापरल्यावर त्याची साल फेकून देऊ नका. त्या सालींवर मीठ टाकून उन्हात ठेवा. काही दिवसांनी लिंबाचं लोणचं तयार होईल.
पोहे न चिकटण्यासाठी: पोहे धुऊन झाल्यावर त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा. यामुळे पोहे एकमेकांना चिकटणार नाहीत आणि मोकळे राहतील.
केळी काळी होऊ नये म्हणून: कच्ची केळी उकळताना ती काळी पडतात. हे टाळण्यासाठी उकळत्या पाण्यात चिमूटभर मीठ आणि हळद घाला. यामुळे केळी काळी होणार नाहीत.
पोळ्या फुलवण्यासाठी: पोळ्या करताना तव्यावर पोळी चिकटते आणि फुगत नाही. हे टाळण्यासाठी तव्यावर थोडे मीठ टाकून पुसून घ्या. यामुळे तवा नॉन-स्टिक होतो आणि पोळी व्यवस्थित फुगते.
केळी साठवण्यासाठी: केळी फ्रिजमध्ये ठेवू नका. फ्रिजमध्ये ठेवल्याने ती लवकर खराब होतात. केळी नेहमी सामान्य तापमानात ठेवा.
किचन स्लब स्वच्छ ठेवण्यासाठी: किचन स्लबची स्वच्छता करण्यासाठी पाण्यात थोडे मीठ मिसळून पुसा. यामुळे मुंग्या, माश्या आणि झुरळे दूर राहतात.
कांदा कापताना डोळ्यात पाणी आल्यास: कांद्याची साल काढून काही वेळ पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही.
कुरकुरीत पुरीसाठी: पुरीचा गोळा मळताना त्यात एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा. यामुळे पुऱ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील.
भेंडी ताजी ठेवण्यासाठी: भेंडी लवकर सुकते. ती ताजी ठेवण्यासाठी भेंडीवर थोडं मोहरीचं तेल लावा. ती जास्त दिवस ताजी राहील.
इडली मऊ बनवण्यासाठी: इडलीचे पीठ तयार करताना तांदूळ आणि उडदाच्या डाळीसोबत थोडा साबुदाणा भिजत घाला. यामुळे इडली मऊ आणि स्पॉन्जी होईल.
लाल मिरची पावडर टिकवण्यासाठी: लाल मिरची पावडरला बुरशी लागते किंवा त्यात ओलसरपणा येतो. हे टाळण्यासाठी मिरचीच्या डब्यात हिंगाचा एक छोटा तुकडा ठेवा. पावडर जास्त दिवस चांगली राहील.
मायक्रोवेव्हमध्ये अन्न लवकर गरम करण्यासाठी: मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताना ते प्लेटमध्ये गोलाकार पसरवा आणि मध्यभागी थोडी जागा रिकामी ठेवा. यामुळे अन्न लवकर आणि समान गरम होते.
भाज्या लवकर शिजवण्यासाठी: भाज्या शिजवताना त्यात चिमूटभर साखर घाला. यामुळे भाज्यांचा रंगही चांगला राहतो आणि त्या लवकर शिजतात.
लसूण सोपे सोलाण्यासाठी: लसूण पाकळ्या गरम पाण्यात ५-१० मिनिटे भिजवून ठेवा. यामुळे त्यांची सालं लगेच निघतात.