फीचर्स

chicken and veg soup : चिकन आणि व्हेज सूप कसे बनवाल?

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रावण संपला, गणपती बाप्पाही गेले मग आता कशाला थांबायचं. नॉनव्हेज स्वादिष्ट अन् चमचमकीत जेवायचंय. नॉनव्हेजचा आस्वाद घ्यायचाय? चिकन खायचा विचार करताय? चला तर मग पाहूयात झणझणीत चिकन आणि व्हेज सूप कसे बनवायचे..

चिकन आणि व्हेज सूप साठी साहित्य :

१. पाच-सहा मध्यम आकाराचे टोमॅटो

२. एक गाजर

३. एक कांदा

४. अर्धा टी स्पून असलेले आले

५. टी स्पून मैदा

६. एक कप दूध

७. चार-पाच कप चिकन स्टॉक

८. मीठ, मीरे, पावडर चवीनुसार

 ९. सजावटीसाठी : ब्रेड स्टिक्स , किसलेले चीज

कृती :

१. सर्व भाज्या चिरून आणि धुऊन चिकन स्टॉकमध्ये शिजवून घ्याव्यात.

२. यानंतर शिजलेल्या भाज्या थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्याव्यात.

३. मोठ्या गाळणीत गाळून स्टॉक तयार करावा.

४. त्यानंतर पातेल्यात बटर गरम गरम करून मैदा परतावा.

५. यानंतर लगेच त्यात दूध घालावे आणि सतत ढवळत मिश्रण शिजवून घ्यावे

६. थोडे घट्ट झाले की, त्यात मीठ, मिरे पावडर घालावी.

७. या मिश्रणावर तयार केलेला स्टॉक ओतून चांगले उकळून घ्यावे

८. थोडे दाटसर झाल्यानंतर गॅस बंद करावा.

९. यानंतर सजावटीसाठी प्रत्येक बाऊलमध्ये सूप ओतून त्यावर किसलेले चीज घालावे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT