New Tata Punch Price Feature: टाटा मोटर्सने आपल्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या टाटा पंचला आता नवीन अवतारात लाँच केली आहे. मायक्रो एसयुव्ही सेगमेंटमधील सर्वात जास्त खपल्या जाणाऱ्या टाटा पंचचे आता फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले असून आकर्षक नव्या लुक आणि दमदार इंजिन ऑप्शनसह टाटा पंच बाजारात दाखल झाली आहे. याची एक्स शोरूम प्राईस ही ५.५९ लाख रूपये ठेवण्यात आली आहे. या गाडीत मोठे बदल केले असून गेल्या मॉडेलच्या तुलनेत यात अनेक फिचर देण्यात आले आहेत.
नवी टाटा पंच आता देशातील सर्वात पहिली ऑटोमेटिक ट्रन्समिशन असलेली सब-कॉम्पैक्ट एसयूव्ही आहे. त्याचबरोबर टाटाने सेफ्टीच्या दृष्टीकोणातून देखील या गाडीवर अजून काम करण्यात आलं आहे. क्रॅश टेस्टवेळी ही गाडी ५० किलोमीटर प्रतीतास वेगाने पळवण्या तआली होती. जागेवर उभ्या असलेल्या ट्रकवर ही गाडी क्रॅश करण्यात आली. त्यावेळी गाडीतील सर्व ४ डमी प्रवासी सुरक्षित होते. जुन्या टाटा पंचचे आतापर्यंत ७ लाख युनिट विकले गेले आहेत.
टाटाने पंचच्या फेसलिफ्टमध्ये पुढच्या बाजूला नवीन लायटिंग एलिमेंट दिले आहेत. पियानो ब्लॅक फिनिश, तसेच लोअर ग्रीलमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. आता टाटा पंच ही नेक्सॉन आणि हॅरियर सफारी सारख्या टाटाच्या मोठ्या एसयुव्हीशी साधर्म्य साधणारी दिसत आहे. नवी फेस लिफ्ट पंच ही सायंटिफिक ब्लू, कॅरमल यलो, बंगाल रूज रेड, डेटोना ग्रे, कुर्ग क्लाऊड सिल्व्हर आणि प्रिस्टिन व्हाईट सारख्या रंगात मिळणार आहे.
टाटाने पंचच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये जास्त प्रीमियम कॅबिन दिली आहे. नवीन ट्वीन स्पोक स्टायलिश व्हील देण्यात आले आहेत. त्यावर टाटाचा इल्युमिनेटेड लोगो लावण्यात आला आहे. जुन्या बटणांऐवजी आता स्टायलिश टॉगल स्विच देण्यात आले आहेत. एसी व्हेंटचे डिझाईन देखील बदलण्यात आलं आहे. आता गाडीत २६.०३ इंची इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आला आहे. त्यात क्लस्टरमध्ये ७ इंची टीएफटी स्क्रीन देखील देण्यात आली आहे.
टाटाने नवीन फेसलिफ्ट पंच ही ६ व्हेडिएन्टमध्ये लाँच केली आहे. त्यात स्मार्ट, प्युअर, प्युअर प्लस, अॅडव्हेंचर, अकम्पलिश्ड आणि अकम्पलिश्ड प्लस अशा व्हेरियंटचा समावेश आहे.
टाटा पंचमध्ये सर्वात मोठा बदल हा इंजिमध्ये करण्यात आला आहे. आता टाटा पंच फेसलिफ्ट ही तीन इंजिन ऑप्शनमध्ये येणार आहे. यात १.२ टर्बो चार्च पेट्रोलन इंजिन दिलं आहे. हे इंजिन टाटाच्या दुसऱ्या मॉडेलमध्ये देखील आहे. त्याचबरोबर १.२ लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन अन् १.२ लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल अन् सीएनजी ऑप्शन देखील मिळणार आहे.