Surya-Chandra Yuti 2026: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात काही राशींसाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच १८ जानेवारी २०२६ रोजी सूर्य आणि चंद्राची खास युती होणार असून, याचा मोठा लाभ काही ठराविक राशींना मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, १४ जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल (मकर संक्रांत). त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी, १८ जानेवारीला चंद्रदेखील मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मकर राशीत सूर्य आणि चंद्राची युती होईल. जेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच राशीत किंवा एकाच भावात येतात, तेव्हा अमावस्येच्या स्थितीमुळे ही युती निर्माण होते. ही स्थिती आर्थिक कामात यश आणि प्रगती मिळवून देण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. जाणून घेवूया या युतीमुळे कोणत्या राशींना लाभकारक ठरणार आहे याविषयी...
मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ आत्मविश्वास आणि धैर्य वाढवणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल आणि नवीन प्रकल्पांची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. विशेषतः सरकारी सेवा, प्रशासन किंवा सुरक्षा क्षेत्रातील व्यक्तींना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer): या युतीमुळे कर्क राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक आणि आर्थिक जीवनात समतोल निर्माण होईल. मालमत्ता, घर किंवा वाहन खरेदीचे योग जुळून येतील. मानसिक ताण कमी होऊन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत.
मकर (Capricorn): सूर्य-चंद्राची युती मकर राशीतच होत असल्याने या राशीच्या व्यक्तींना मान-सन्मान आणि पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. राजकारण, मीडिया, व्यवस्थापन आणि कला क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ प्रगतीचा ठरेल. समाजात तुमची प्रतिमा अधिक उंचावेल.