Shukra Shani Yuti 2026 | ३० वर्षांनी बनली शुक्र-शनीची दुर्मिळ युती; ‘या’ चार राशींचे नशीब उजळणार file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Shukra Shani Yuti 2026 | ३० वर्षांनी बनली शुक्र-शनीची दुर्मिळ युती; ‘या’ चार राशींचे नशीब उजळणार

शुक्र-शनीच्या युतीमुळे ‘या’ ४ राशींना करिअर आणि पैशात मोठा फायदा

पुढारी वृत्तसेवा

shukra shani yuti 2026 meen rashi benefits taurus gemini libra scorpio career money astrology

पुढारी ऑनलाईन :

वैदिक ज्योतिषानुसार दोन ग्रह एकाच राशीत आल्यास त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. सध्या मीन राशीत शुक्र आणि शनी यांची दुर्मिळ युती तयार झाली आहे. ही युती 2 मार्च 2026 पासून सुरू होऊन 26 मार्चपर्यंत प्रभावी राहणार आहे. जवळपास 30 वर्षांनंतर तयार झालेली ही युती काही राशींसाठी अत्यंत शुभ मानली जात आहे.

ज्योतिष मान्यतेनुसार या काळात धन, करिअर आणि व्यवसायाशी संबंधित क्षेत्रात सकारात्मक बदल दिसू शकतात. काही लोकांचे अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. विशेषतः वृषभ, मिथुन, तुला आणि वृश्चिक राशींसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. पाहूयात या दुर्मिळ ग्रहांच्या युतीचा पुढील राशींच्या लोकांवर कोणता प्रभाव पडणार आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुलू शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायातही फायदा होण्याचे संकेत आहेत.

मिथुन

मिथुन राशींसाठी करिअरमध्ये बदलाचे संकेत आहेत. बराच काळ अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

तुळ

तुळ राशीच्या लोकांसाठी भाग्य साथ देण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. भागीदारीतील व्यवसायातही फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशींसाठी हा काळ अनेक इच्छा पूर्ण करणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. नोकरीत प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचेही चांगले योग आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT