मजनू भाईने 'त्‍या' आयकॉनिक पेंटिंगचा सांगितला अर्थ, ज्यामुळे अक्षय कुमारलाही बसला धक्का

सुपरहिट कॉमेडी चित्रपट वेलकममध्ये अनिल कपूर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग होता.
Welcome bollywood film
मजनू भाईने 'त्‍या' आयकॉनिक पेंटिंगचा सांगितला अर्थ, ज्यामुळे अक्षय कुमारलाही बसला धक्काfile photo
Published on
Updated on

anil kapoor explained the meaning of the iconic painting from welcome said this is not just a joke

पुढारी ऑनलाईन :

Welcome या 2007 मधील सुपरहिट कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करून गेला. या चित्रपटाला आज खूप वर्षे झाली आहेत. मात्र या चित्रपटातील एक आयकॉनिक प्रसंग आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो. चित्रपटात Anil Kapoor यांनी ‘मजनू भाई’ ही भूमिका साकारली होती. या पात्राने काढलेली एक विचित्र पेंटिंग चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मीम-कल्चरचा भाग बनली आहे.

Welcome bollywood film
Bigg Boss Marathi - 6 | सोफ्यावर राखीने फेकलं पाणी, विशाल-राखीमध्ये बाचाबाची; बिग बॉसच्या घरात होणार पंगा?

“ही फक्त मजा नाही...”

अलीकडेच Anil Kapoor हे Akshay Kumar च्या ‘द व्हील ऑफ फॉर्च्यून’ या होळी-स्पेशल एपिसोडमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा ती प्रसिद्ध पेंटिंग दाखवत तिच्यामागील अर्थ सांगितला.

अनिल कपूर म्हणाले की, त्या पेंटिंगमध्ये एक घोडा आणि गाढव दाखवले आहे. घोडा कष्ट, मेहनत आणि सक्रियतेचे प्रतीक आहे, तर गाढव हळूहळू धावणारे दाखवले आहे. या चित्राचा अर्थ असा की अनेकदा मेहनत करणाऱ्यांना योग्य ओळख मिळत नाही, पण काही वेळा कमी मेहनत करणाऱ्यांनाच जास्त श्रेय मिळते. जसे की काही ठिकाणी बॉस आणि कर्मचाऱ्यांच्या नात्यात दिसते असे ते म्हणाले.

Welcome bollywood film
Iran - America War | 'हास्य जत्रा’ फेम विशाखा सुभेदार यांचा मुलगा आज रात्री कुवेत येथून परतणार!

अनिल कपूर यांनी विनोदाने असेही सांगितले की, बाहेर या पेंटिंग असलेल्या टी-शर्ट्स विकल्या जातात आणि त्यातून त्यांना रॉयल्टीही मिळते. हे ऐकून अक्षय कुमार देखील आश्चर्यचकित झाला.

‘सूबेदार’मध्ये दिसणार अनिल कपूर

सध्या Anil Kapoor बहुप्रतीक्षित Subedaar या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. ‘सूबेदार’ हा अ‍ॅक्शनपट असून त्याचे दिग्दर्शन Suresh Triveni यांनी केले आहे.

या चित्रपटात Mona Singh, Radhika Madan, Saurabh Shukla, Aditya Rawal, Faisal Malik आणि Khushbu Sundar हे कलाकारही झळकणार आहेत. हा चित्रपट 5 मार्च रोजी स्ट्रीम होणार आहे.

अनिल कपूरचा वर्कफ्रंट

‘सूबेदार’व्यतिरिक्त Anil Kapoor अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. ते मागील वर्षी War 2 मध्ये दिसले होते. यावर्षी ते Alpha आणि King या चित्रपटांमध्येही दिसणार आहेत. ‘किंग’ या चित्रपटातही अनेक नामांकित कलाकार झळकणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news