Pitru Paksha Tithi 2025 
ज्योतिष आणि धार्मिक

Pitru Paksha Rituals | पिंडदान, नैवेद्य व धार्मिक प्रथा; श्राद्ध विधीची वाचा सविस्तर माहिती

Pitru Paksha Rituals | श्राद्ध ही आपल्या भारतीय परंपरेतील अतिशय महत्त्वाची व पवित्र धार्मिक क्रिया आहे.

पुढारी वृत्तसेवा

चिंतामणी केळकर, आसगाव बार्देश गोवा

श्राद्ध ही आपल्या भारतीय परंपरेतील अतिशय महत्त्वाची व पवित्र धार्मिक क्रिया आहे. यात पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पिंडदान, तर्पण आणि नैवेद्य अर्पण करून त्यांचे स्मरण केले जाते. श्राद्ध विधीमध्ये अनेक सूक्ष्म नियम व परंपरा पाळल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया श्राद्धाची सविस्तर प्रक्रिया

चुलते मामा भाऊ त्यांच्या बायका मुले मृत असतात त्यांची नावे घेऊन प्रत्येकी एकच पिंड देतात आत्या मावशी वहिनी यांचे यजमान यांची नावे घेऊन प्रत्येकी एकच पिंड देतात. ज्या व्यक्तीमृत आहेत त्या सर्वांची क्रमवार यादी आणि तेवढे आवळ्याच्या आकाराचे पिंड अगोदर तयार करून घ्यावे अधिक एक धर्मपिंड (काही चुकून राहिले असल्यास त्यासाठी) म्हणून तयार करावा.

  • पिठाचे किंवा शिजवलेल्या भाताचे पिंड करतात यामध्ये तूप मध काळे तीळ घालून एकजीव करून त्याचे पिंड करतात.

  • सर्व ठिकाणी साधारणपणे आले लिंबू यांचे तुकडे नैवेद्यासाठी खीर आणि वडे द्रोणांमधून ठेवण्याची पद्धत आहे.

  • पश्चिमेकडे एक पान देवतांसाठी आणि दक्षिणेकडे एक पान इतरांसाठी असे ठेवून श्राद्ध करतात. पश्चिमेकडील पानावर दोन दर्भ यव (एक धान्य) किंवा तांदूळ आणि सुपारी ठेवतात. आणि दक्षिणेकडील पानावर तीन दर्भ तीळ सुपारी ठेवतात.

दर्भ साधारण चार इंच ते सहा इंच एवढे असावेत.

  • यामध्ये देवतांच्यासाठी पश्चिम दिशेकडील पान आणि पित्रांसाठी दक्षिणेकडील पान अशा पद्धतीने दोन ठिकाणी पूजा करणे महत्त्वाचे असते.

  • शेंडी किंवा केसात गर्भ जानव्याला दरबार उजव्या कनवटीला थोडे तांदूळ आणि दर्भ डाव्या कनवटीला तीळ आणि थोडे दर्भ ठेवतात. अनामिकेमध्ये दोन दर्भाची मिळून केलेली अंगठी सारखी वस्तू घालावी, याला पवित्रक असे म्हणतात.

  • सर्व जेवणाबरोबर खीर आणि वडे या दोन गोष्टी कोकणपट्टीत आणि गोव्यामध्ये लिंबाचे तुकडे आणि आल्याचे तुकडे, या गोष्टींना महत्त्व असते.

सव्य आणि अपसव्य

  • सव्य आणि अपसव्य या दोन शब्दांचा प्रामुख्याने यावेळी उच्चार केला जातो सव्य म्हणजे नियमित प्रमाणे असलेले जानवे, किंवा डाव्या खांद्यावर पूजेवेळी असलेले वस्त्र, आणि अपसव्य म्हणजे याच्या विरुद्ध उजव्या खांद्यावरून आणि डाव्या हाताखाली जाणवे ठेवणे किंवा खांद्यावरील वस्त्र दुसऱ्या बाजूला ठेवणे

  • चट्श्राद्ध हा नियमित ऐकू येणारा शब्द असून याचा अर्थ, चट म्हणजे दर्भ, आणि जेवणासाठी प्रत्यक्ष एक किंवा अनेक व्यक्ती न बसवता त्या ऐवजी पानावर दर्भ ठेवून पूजा (श्राद्ध) करणे.

  • स्वतःला गंध वगैरे लावताना उजव्या मध्यमेचा उपयोग करतात. देवांना गंध वगैरे लावताना अनामिकेने (करंगळी च्या जवळचे बोट)लावावे.

म्हणून, विष्णू स्मरण करण्याची पद्धत आहे

पितराना लावताना तर्जनीने(अंगठ्या जवळचे बोट) लावावे. ऋषी संन्यासी यांना करंगळीने लावण्याची पद्धत आहे.

पानाखाली किंवा समोर जमिनीवर पाण्याने आकृती काढण्याची पद्धत आहे, दक्षिणेकडील पितरांच्या पानाखाली किंवा समोर गोल पाण्याची आकृती जमिनीवर काढतात तर पश्चिमेकडील देवतेच्या पाना साठी चौकोनी पाण्याची आकृती काढतात.

तीलोदकाधी पाणी सोडताना डाव्या हाताने त घेऊन ते देवते त्याच स्मरणाच्या वेळी सरळ समोरून म्हणजे तर्जनी मध्यमा अनामिका यांचे मधून तर आणि सर्व बोटे मिटून पितरांच्या वेळी अंगठ्यावरून म्हणजे चार बोटांची मूठ करून फक्त अंगठा वेगळा ठेवून त्यावरून पाणी सोडणे. आणि अंगठ्या सर्व बोटे मिटवून करंगळीच्या खालील भागातून पाणी सोडणे याला ऋषीतीर्थ असे म्हणतात.

दिवा अगरबत्ती कापूर दाखवताना देवतांना नेहमीप्रमाणे तर पितराना वगैरे दाखवताना उलट क्रमाने म्हणजे (अँटि क्लॉक) दाखवावा असे असले तरी एक याबद्दल एकवाक्यता नाही.

आपल्या सर्व धार्मिक विधी मध्ये सर्वप्रथम गणेश पूजा करण्याची पद्धत आहे, मात्र श्राद्ध प्रयोगादी (अंतेष्टी म्हणजे मृत्यू संदर्भातील कार्यात गणेश पूजा करत नाहीत. या ऐवजी विष्णू स्मरण करण्याची पद्धत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT