

मेष : ज्यांनी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही गुंतवणूक केली होती, त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता.
वृषभ : गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात शक्ती खर्च करू नका. त्यापेक्षा अन्य योग्य कामासाठी तिचा वापर करा.
मिथुन : प्रेम असफल ठरेल. कलात्मक क्षमतेमुळे अनेकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षीसही मिळेल.
कर्क : कामाच्या ठिकाणी आज तुमचा दिवस आहे. मत विचारल्यानंतर मांडताना भीती बाळगू नका, मताचे कौतुक होऊ शकते.
सिंह : आज तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल; परंतु तुम्हाला ते मिळणार नाही. कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल.
कन्या : दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, कामाच्या ठिकाणी उत्साही असाल. संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील.
तूळ : तुमच्या कामाच्या ठिकाणी दृष्टिकोन आणि कामाचा दर्जात सुधारणा होईल. गरजवंतांना मदत केल्याने आदर मिळेल.
वृश्चिक : सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस. तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचेल.
धनु : जुन्या ओळखी आणि संबंधांना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. कोणीतरी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकते.
मकर : मेहनत करावी लागेल. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता. ज्यामुळे केवळ तुम्ही नाही तर कुटुंबीय आनंदी होईल.
कुंभ : एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा शक्यता आहे. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका.
मीन : कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे.