प्रातिनिधिक छायाचित्र. file Photo
ज्योतिष आणि धार्मिक

Shani Margi 2025 : शनि मीन राशीत मार्गी, 'या' राशीला आगामी २३३ दिवस राहावे लागेल सावधान

शनि ग्रहाच्या बदललेल्या मार्गक्रमणाचा सर्व राशींच्या जातकांवर पडणार प्रभाव

पुढारी वृत्तसेवा

Shani Margi In Meen 2025 : शनि ग्रह न्यायाचा कारक मानला जातो. हा ग्रह जातकाला त्याच्या कर्माची फळे देतो. अत्यंत संथ गतीने वाटचाल करणारा हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी घेतो. २८ नोव्हेंबर रोजी शनि देव मीन राशीत मार्गी झाले आहेत. याचा परिणाम सर्वच राशींवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीला पुढील २३३ दिवस विशेष सावधानता बाळगावी लागणार आहे. जाणून घेऊया शनीचे मीन राशीत मार्गी होण्याचा कुंभ राशीवर होणाऱ्या परिणामाविषयी...

व्यवसायासह नोकरीत कठोर परिश्रम

शनि ग्रहाचे मीन राशीमध्ये मार्गी झाल्याने कुंभ राशीच्या जातकांना व्यवसायासह नोकरीत कठोर परिश्रम करावे लागतील शत्रूंपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. नोकरीतही चढ-उतार येऊ शकतात; परंतु तुम्ही कठोर परिश्रम सोडू नये. राजकारणात असणाऱ्यांसाठी हे दिवस फायदेशीर असतील. मात्र व्यवसाय अपेक्षित निकाल देत नसल्याने तुम्हाला काही निराशेचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबींमध्येही तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.

कौटुंबिक तणावाचा करावा लागेल सामना

या काळात कुंभ राशीच्या जातकांना कौटुंबिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबापासून दूर जाण्याची इच्छा देखील होऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नातेसंबंध जपण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. काळानुसार सर्व काही ठीक होईल. वैवाहिक जीवनात तणाव असतील ते कमी होतील. दांपत्य जीवनात सामंजस्य राहील. नाते मजबूत होईल.

विद्यार्थ्यांसाठी असेल आव्हनात्मक काळ

शनि देव मीन राशीत मार्गी झाल्यानंतर आता पुढील २३३ दिवसांचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक काळ असेल. कोणतीही घाई टाळावी. अन्यथा नुकसानाचा सामना करावा लागेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले असेल.

आरोग्याची काळजी घेणे ठरेल हितावह

शनीच्या प्रभावामुळे, कुंभ राशीच्या लोकांना आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात. हाडांशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्यांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे. अन्यथा गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तुमची दैनंदिन दिनचर्या ही आरोग्यपूरक असेल अशी काळजी घ्या.

टीप: वरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्‍मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT