

Shani Gochar 2026 : शनि ग्रह म्हटलं की, सत्त्वपरीक्षा हा शब्द अनेकांच्या मनात येतो. न्यायाचा कारक मानला जाणार हा ग्रह जातकाला त्याच्या कर्माची फळे देतो. अत्यंत संथ गतीने वाटचाल करणारा हा ग्रह एक राशीतून दुसर्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी घेतो. आयुष्यातील दुःख, रोग, पीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, लोखंड, खनिज तेल, कर्मचारी, सेवक, तुरुंग अशा अनेक गोष्टींचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, आता २०२६ मध्ये शनि ग्रह चांदीच्या पायावर चालेल. संपूर्ण वर्षभर शनि मीन राशीत असेल. यामुळे काही राशींसाठॅ २०२६ हे वर्ष अत्यंत लाभकारकर ठणार आहेत. जाणून घेवूया या राशींविषयी...
जेव्हा एखादा ग्रह कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रभाव जन्म राशीपासून (चंद्र रास) विविध भावांवर पडतो. या प्रभावांना सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या रूपात पाहिले जाते. जेव्हा शनि संक्रमणादरम्यान चंद्र राशीच्या दुसऱ्या, पाचव्या आणि नवव्या घरात भ्रमण करतो तेव्हा त्याला चांदीचा पाय म्हणतात. मीन राशीत शनीचे संक्रमण चांदीच्या पायावर असेल. शनीचे चांदीच्या पायावर चालणे हे अत्यंत शुभ मानले जाते.
वृश्चिक राशीसाठी शनि ग्रहाची चांदीचा पाय आयुष्यात सकारात्मक परिणाम आणेल. तणाव आणि आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळेल. या राशीच्या लोकांसाठी हा चांगला काळ आहे. आर्थिकदृष्ट्या व्यवसायाच्या उत्तम संधी मिळतील. कुटुंबात आनंद आणि समृद्धी वाढेल. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
कर्क राशीच्या जातकांनाही शनीदेवाचे चांदीच्या पायी चालणे विशेष फायदेशीर ठरणार आहे. त्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत, तुम्हाला मालमत्ता आणि चांगले परतावा देखील मिळू शकतो. अनेक स्रोतांकडून पैसा येईल; परंतु तुम्ही व्यवस्थापन कसे करता यावर तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल.
कुंभ राशीच्या जातकांसाठी २०२६ हे वर्ष नवीन संधी घेऊन येणारे ठरेल. व्यवसाय आणि करिअरमध्ये महत्त्वपूर्ण संधी मिळतील. राजकारणात असणार्यांना फायदा मिळेल. तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडतील. कुटुंबीय जीवन आंनंदी राहिल.
टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.