Brahma Muhurat : ब्रह्ममुहूर्तावर उठून करा 'ही' 3 कामे, मिळेल यश, होईल प्रगती file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Brahma Muhurat : ब्रह्ममुहूर्तावर उठून करा 'ही' 3 कामे, मिळेल यश, होईल प्रगती

पहाटे ३:२० ते ३:४० ही वेळ खास का? सद्गुरुंनी सांगितले ब्रह्ममुहूर्ताचे महत्‍व

पुढारी वृत्तसेवा

sadguru tips brahma muhurat best time to wake up benefits morning routine hindu dharma

पुढारी ऑनलाईन :

आजकाल बहुतेक लोकांची सकाळ अलार्मच्या मोठ्या आवाजाने आणि धावपळीने सुरू होते. मात्र सद्गुरु (जग्गी वासुदेव) यांच्या मते, झोपेतून उठण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे पहाटे सुमारे ३:२० ते ३:४० दरम्यान. या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. या काळात शरीर आणि निसर्गाची ऊर्जा संतुलित असते, म्हणून ध्यान, योग आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ मानली जाते.

ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय?

सद्गुरु यांच्या मते, ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधीचा काळ. प्राचीन काळापासून ही वेळ पूजा, ध्यान आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातो. या वेळी वातावरण शांत असते आणि शरीरही अधिक सक्रिय असते. त्यामुळे ध्यान करताना मन सहज खोलवर जाते आणि एक वेगळीच शांतता अनुभवता येते.

ब्रह्ममुहूर्त साधारणतः पहाटे ३:२० ते ३:४० च्या सुमारास सुरू होतो. या वेळी उठल्याने मेंदू अधिक स्वच्छ राहतो, विचारशक्ती सुधारते आणि मन-शरीर संतुलित राहते. त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने होते.

साधनेसाठी सर्वोत्तम वेळ

सद्गुरु सांगतात की ही वेळ ध्यान, प्राणायाम आणि ईश्वरभक्तीसाठी अतिशय योग्य आहे. या वेळी आसपास फारसा आवाज नसल्यामुळे एकाग्रता वाढते. लवकर उठल्याने तुम्ही दिवसाची चांगली योजना करू शकता. यामुळे दिवसभर शांतता राहते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.

ब्रह्ममुहूर्तात काय करावे?

सकाळी उठून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे शरीरासोबत मनही स्वच्छ आणि हलके वाटते.

यानंतर पूजा, मंत्रजप किंवा ध्यान करणे फायदेशीर ठरते.

तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे आणि तुळशीला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते.

असे केल्याने नकारात्मकता दूर होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी होतात. तसेच करिअरमधील अडथळे दूर होण्यासही मदत होते.

नियमितपणे ब्रह्ममुहूर्तात उठण्याची सवय लावल्यास व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT