पुढारी वृत्तसेवा
ध्यान (Meditation) ही केवळ शांत बसण्याची प्रक्रिया नसून ती मन आणि शरीर यांना जोडणारी एक कला आहे.
पण ध्यान कितीवेळ करावे व त्याचात नियमितपणा हा खूप महत्वाचा आहे. जर नुकतेच कसेही, कधीही ध्यान केल्याने अपेक्षित लाभ मिळतीलच असे नाही
ध्यानाचे काही मुख्य फायदे, मानसिक शांतता: सततच्या विचारांपासून मुक्ती मिळते आणि मनाला स्थिरता लाभते.
तणावमुक्ती शरीरातील 'कोर्टिसोल' या स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे चिडचिड आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.
एकाग्रता वाढते: कामात किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते आणि सकारात्मकता वाढते.
चांगली झोप: ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, त्यांना ध्यानामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. नियमित ध्यानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तदाब संतुलित राहतो.
पण ध्यानाचा फायदा हा तो 'किती वेळ' केला यापेक्षा 'किती सातत्याने' केला यावर जास्त अवलंबून असतो.
जर तुम्ही नवीन असाल, तर दररोज फक्त ५ ते १० मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू हा वेळ वाढवून १५ ते २० मिनिटांपर्यंत नेणे आदर्श मानले जाते.
वेळेपेक्षा सातत्य महत्त्वाचे: दिवसातून एकदा ४० मिनिटे ध्यान करण्यापेक्षा, रोज न चुकता १०-१० मिनिटे ध्यान करणे जास्त प्रभावी ठरते.
यानंतर महत्वाची ठरते ती म्हणजे वेळ: शक्य असल्यास पहाटे (ब्रह्ममुहूर्त) किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ध्यान करावे.
शांत आणि हवेशीर जागा निवडा जिथे तुम्हाला कोणी विचलित करणार नाही. पाठीचा कणा ताठ ठेवून सुखासनात बसा.
ध्यानाचे फायदे लगेच एका दिवसात किंवा चार दिवसात दिसत नाहीत. किमान २१ ते ३० दिवस सातत्याने सराव केल्यास तुम्हाला तुमच्या स्वभावात आणि आरोग्यात सकारात्मक बदल जाणवू लागतील.