Rahu Gochar 2026 file photo
ज्योतिष आणि धार्मिक

Rahu Gochar 2026 : कुंभ राशीत राहु गोचर; पुढील ६ महिने 'या' ३ राशींना लॉटरी, होणार धनवर्षाव!

Rahu Gochar 2026 : कुंभ राशीतील राहुचे हे गोचर या वर्षाच्या ५ डिसेंबरपर्यंत असेल

पुढारी वृत्तसेवा

Kumbh Rashi Rahu Gochar : ज्योतिषशास्त्रात राहु ग्रहाला इतर ग्रहांच्या तुलनेत 'मायावी ग्रह' मानले जाते. राहु अतिशय संथ गतीने मार्गक्रमण करतो. कुंडलीत राहुची स्थिती शुभ असेल, तर ती व्यक्तीला रंकाचा राजा बनवू शकते; तर राहुची अशुभ स्थिती जीवनात अनेक अडचणी निर्माण करते. सध्या राहु ग्रह शनीच्या स्वामित्वाच्या कुंभ राशीत विराजमान आहे. हिंदू पंचांगानुसार, कुंभ राशीतील राहुचे हे गोचर या वर्षाच्या ५ डिसेंबरपर्यंत असणार आहे. शनीच्या राशीतील राहुच्या या वास्तव्यामुळे कोणत्या राशींवर या मायावी ग्रहाची शुभ दृष्टी राहील, ते जाणून घेऊया ...

मेष राशीच्‍या जातकांसाठी अत्‍यंत लाभदायक

मेष राशीच्या जातकांसाठी शनीच्या कुंभ राशीतील राहुचे गोचर अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल. व्यवसायात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या कौशल्याच्या जोरावर सर्व आव्हानांवर सहज मात कराल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. एखादी गोड बातमी मिळण्याचीही शक्यता आहे.

तूळ राशीच्‍या जातकांचा वाढेल आत्‍मविश्‍वास

तुला राशीच्या लोकांसाठी कुंभ राशीतील राहुचे गोचर फायदेशीर मानले जात आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामावर तुमचे पूर्ण लक्ष केंद्रित राहील. तुमच्या चिकाटीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नशिबाची पूर्ण साथ लाभेल. कोर्ट-कचहरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल.

धनु राशीचे जातक अनुभवतील सुख-शांती

धनु राशीच्या जातकांसाठी शनीच्या राशीतील राहुचे गोचर भाग्यवान ठरेल. यामुळे तुमच्या जीवनात सुख-शांती नांदेल. कार्यक्षेत्रातील तुमच्या अडचणी आता संपू लागतील. तुम्ही स्वतःला अधिक कार्यक्षम आणि आत्मविश्वासी अनुभवाल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्हाला तुमचे वडील आणि गुरुंचे पूर्ण सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात मन रमेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. फक्त स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT