Grah Gochar July 2026  Pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Grah Gochar July 2026 : जुलैत बदलणार प्रभावशाली ग्रहांची चाल; 'या' ४ राशींचे भाग्य चमकणार! तर 'या' राशींनी राहावे सावध!

एकाच महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि शनि यांसारखे मोठे ग्रह बदलणार दिशा आणि गती

पुढारी वृत्तसेवा

July 2026 Montly Horoscope : आज २०२६ वर्षातील जुलै महिन्‍याचा प्रारंभ झाला आहे. जुलै २०२६ या नवीन महिन्याची आजपासून सुरुवात झाली असून, ज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोन्ही दृष्टीकोनातून हा महिना कमालीचा महत्त्वाचा ठरणार आहे. या एकाच महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि शनि यांसारखे मोठे आणि प्रभावशाली ग्रह आपली दिशा आणि गती बदलणार आहेत. जेव्हा एकाच वेळी एवढे मुख्य ग्रह मागे-पुढे होतात, तेव्हा त्याचा थेट आणि मोठा परिणाम सर्वच राशींवर होतो. या ग्रहांच्या मोठ्या बदलांमुळे ४ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार असून, त्यांना प्रचंड यश मिळू शकते. मात्र, दुसरीकडे इतर काही राशींच्या लोकांना या काळात प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल आणि विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

शनि, बुध, सूर्य आणि शुक्राच्या बदलणार्‍या गतीचा 'असा' पाडणार प्रभाव!

'दृक पंचांग'नुसार, जुलै २०२६ च्या शेवटी शनि देव कुंभ राशीत वक्री म्हणजेच उलट चालीने फिरत असतील. शनि ग्रहाची गती खूप संथ (हळूहळू) असते, त्यामुळे त्यांचा हा प्रभाव लोकांच्या जीवनावर दीर्घकाळ आणि खोलवर जाणवेल. २४ जुलै रोजी बुध ग्रहाच्या स्थितीत मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत उलटी चाल चालणारा बुध ग्रह आता 'मार्गी' होईल म्हणजेच सरळ चालीने फिरू लागेल. बुध हा बुद्धी आणि व्यापाराचा कारक मानला जात असल्यामुळे, या बदलानंतर व्यापार-व्यवसाय, विचारशक्ती आणि संवाद साधण्याच्या पद्धतीत मोठी सुधारणा पाहायला मिळू शकते. १६ जुलै रोजी सूर्य देव मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करतील. सूर्याच्या या बदलाला ज्योतिषशास्त्रात 'कर्क संक्रांती' म्हटले जाते. हिंदू धर्मात आणि ज्योतिषात या दिवसाला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच, म्हणजेच ४ जुलै रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख-सुविधा, धन-वैभव, ऐश्वर्य आणि प्रेमाचा कारक मानले जाते. त्यामुळे शुक्राच्या या राशी बदलामुळे अनेकांच्या कौटुंबिक जीवनासह राहणीमानात सुखाचे दिवस येऊ शकतात.

मेष

मेष : आर्थिक लाभाची संधी

बुध आणि सूर्य यांच्या राशी परिवर्तनामुळे आर्थिक लाभाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कार्यस्थळी तुमचा मान-सन्मान वाढेल. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ अनुकूल आहे. कौटुंबिक जीवन सुखद राहील.

सिंह

सिंह : पदोन्नतीची शक्‍यता

शुक्र आणि सूर्य यांच्या स्थितीतील बदलामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती लक्षणीयरीत्या सुधारेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.

तूळ

तूळ : व्‍यवसायात लाभ

जुलै महिन्यातील ग्रहांच्या या बदलामुळे तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. व्यावसायिकांना चांगल्या नफ्याची अपेक्षा करता येईल. तसेच, तुमच्या आरोग्यातही सुधारणा दिसून येईल.

धनू राशीच्‍या जातकांना प्रवासातून लाभ

शनीची अनुकूल स्थिती आणि बुधाचे राशी परिवर्तन तुमचे भाग्य उजळवेल. लांबच्या प्रवासाच्या संधी निर्माण होतील आणि त्या फायदेशीर ठरतील. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश मिळू शकेल.

सावधगिरी बाळगण्याची गरज असलेल्या राशी

मिथुन : बोलण्‍यावर नियंत्रण ठेवा

ग्रहांच्या बदलांमुळे अचानक खर्च वाढू शकतो, ज्यामुळे तुमचे बजेट विस्कळीत होण्याची शक्यता आहे. कार्यस्थळी सहकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. या महिन्यात आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मकर

मकर : आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नये

जुलै महिना मानसिक तणाव घेऊन येऊ शकतो. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका; आहाराकडे विशेष लक्ष द्या. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.

कुंभ

कुंभ : आर्थिक गुंतवणूक टाळावी

शनीची चाल आणि इतर ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या चालू कामांमध्ये काही किरकोळ अडथळे येऊ शकतात. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. या महिन्यात गुंतवणूक करणे टाळा, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते.

मीन

मीन : कौटुंबिक मतभेद टाळा

कौटुंबिक पातळीवर गैरसमज निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. संयम हीच या महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT