ज्योतिष आणि धार्मिक

Mangal Gochar 2026 | मंगळाचा कुंभ राशीत प्रवेश: 'अंगारक योग' बनणार; पण 'या' राशींना होणार विशेष लाभ

Mangal Gochar 2026 मंगळ ग्रहाचा कुंभ राशीतील प्रवेशामुळे 'पंचग्रहीय योग' तयार होणार

पुढारी वृत्तसेवा

Mangal Gochar 2026

मुंबई : ज्‍योतिषशास्‍त्रानुसार, मंगळ ग्रहाने आज (दि. २३ फेब्रुवारी) दुपारी १२:३० नंतर शनीच्या दुसऱ्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश केला आहे. या ग्रह परिवर्तनामुळे कुंभ राशीत 'पंचग्रहीय योग' (पाच ग्रहांची युती) तयार होईल. हा योग १ मार्च २०२६ पर्यंत राहणार आहे. मंगळ, सूर्य आणि राहू एकत्र आल्यामुळे 'प्रबल अंगारक योग' निर्माण होत आहे. जरी गुरु ग्रहाच्या शुभ दृष्टीमुळे नकारात्मकता काही प्रमाणात कमी होईल. तसेच हा पंचग्रहीय योग काही राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. जाणून घेवूया या राशींविषयी...

मेष

मेष राशीच्‍या जातकांना आर्थिक फायद्याचे योग

मेप राशीच्‍या जातकांच्‍या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल, मात्र कौटुंबिक कामांवर खर्च वाढणार आहे. कुटुंबाची प्रगती होईल. संवाद क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांना विशेष लाभ मिळेल. मुलांच्‍या प्रगतीमुळे सुखावाल. मन आनंदी राहील. शत्रूंवर विजय मिळेल आणि कर्जातून सुटका होऊ शकते.

वृषभ

वृषभ राशीच्‍या जातकांना सरकारी कामात लाभ

वृषभ राशीच्‍या जातकांना सरकारी कामातून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. छातीचे विकार, सर्दी, खोकला किंवा ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. वाहनावर खर्च होईल किंवा वाहनामुळे ताण येऊ शकतो. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वतःला दुखापत होणार नाही याचीही दक्षता घ्या.

मिथुन

मिथुन राशीच्‍या जातकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

मिथुन राशीच्‍या जातकांची रखडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्ये आणि मंगल कार्यात सहभागी झाल्यामुळे फायदा होईल.

कन्या

कन्‍या राशीच्‍या जातकांना मिळेल आनंदाची बातमी

कन्‍या राशीच्‍या जातकांना व्यवसाय किंवा नोकरीच्या संदर्भात आनंदाची बातमी मिळू शकते. शत्रूवर विजय मिळवाल. स्पर्धा परीक्षेत किंवा कामात तगडी स्पर्धा पाहायला मिळेल.

धनु

धनु राशीच्‍या जातकांच्‍या आत्‍मविश्‍वासात होईल वाढ

धनु राशीच्‍या जातकांच्‍या आत्‍मविश्‍वासत वाढ होईल, अंगारक योगाचा प्रभाव कमी असेल, तरीही सावध राहणे गरजेचे आहे.विशेषतः कागदपत्रांच्या बाबतीत सतर्क राहा.तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT