ज्योतिष आणि धार्मिक

shukra gochar 2026 | शुक्र ग्रह १२ महिन्यांनंतर करणार मीन राशीत प्रवेश; 'या' राशींना होणार विशेष लाभ

वैभाचा कारक मानल्‍या जाणार्‍या शुक्र ग्रहाचे आपल्‍या उच्‍च राशीतील प्रवेशाचा सर्व राशींवर पडणार प्रभाव

पुढारी वृत्तसेवा

shukra gochar 2026

ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपल्या उच्च आणि स्वराशीमध्ये भ्रमण करत असतात, ज्याचा व्यापक परिणाम मानवी जीवनासह देश-दुनियेवर होत असतो. २०२६ च्या सुरुवातीलाच वैभव आणि सुखवस्‍तुंचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या या गोचराचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरी, ३ राशींसाठी हा काळ 'गोल्डन टाइम' ठरू शकतो. या काळात त्यांना वैवाहिक सुखासह संपत्तीमध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. जाणून घेवूया या तीन भाग्‍यवान राशीविषयी...

कुंभ

कुंभ राशीच्‍या जातकांना आकस्‍मिक धनलाभाचे योग

शुक्र ग्रहाचे गोचर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत सकारात्मक ठरू शकते. शुक्र तुमच्या गोचर कुंडलीतील दुसऱ्या स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल आणि तुम्हाला वेळोवेळी आकस्मिक धनलाभाचे योग येतील. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती आणि सहकार्याचे वातावरण राहील, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि सामाजिक ओळख अधिक मजबूत होईल. आर्थिक स्थितीतही मोठी सुधारणा पाहायला मिळेल.

मीन

मीन राशीच्‍या जातकांना मालमत्ता खरेदीचे योग

शुक्राचे हे गोचर मीन राशीच्या लोकांसाठी वरदान ठरू शकते, कारण शुक्र तुमच्या राशीच्या प्रथम स्थानी (लग्नेश) भ्रमण करणार आहे. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. या काळात तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. विवाहित व्यक्तींचे जीवन सुखमय राहील. एखाद्या जुन्या कामात यश मिळाल्याने मोठा लाभ होईल. तसेच, भागीदारीतील व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत.

मिथुन

मिथुन राशीच्‍या जातकांच्‍या उद्योग-व्यवसायात मोठी प्रगती

मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर अतिशय अनुकूल ठरेल. शुक्र तुमच्या राशीतून 'कर्म' भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुम्हाला उद्योग-व्यवसायात मोठी प्रगती पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती (Promotion) मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन ग्राहक मिळतील, चांगले सौदे होतील आणि नफ्याचे प्रमाण वाढेल. व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन डील्स आणि भागीदारीसाठी उत्तम राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल आणि वडिलांसोबतचे नाते अधिक मजबूत होईल.

टीप: वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्‍मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT