Akshaya Tritiya 2026 pudhari
ज्योतिष आणि धार्मिक

Akshaya Tritiya 2026: लक्ष्मी मातेच्या 'या' ५ प्रीय राशींचे अक्षय तृतीयेपासून सुरू होणार 'शुभ लाभा'चे दिवस

Anirudha Sankpal

Akshaya Tritiya 2026: हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला एक वेगळं महत्व आहे. अक्षय तृतीया ही अत्यंत शुभ आणि पवित्र सण माणला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा आणि आराधना केली जाते. या तिथीला केलेले कोणतेही कार्य अशुभ फल होत नाही. कारण अक्षय तृतीया हा एक शुभ मुहुर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.

मान्यतेनुसार या दिवशी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो. तर ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशींमधील काही राशी अशा आहेत ज्यांच्यावर संपूर्ण वर्ष माता लक्ष्मीची कृपादृष्टी असते. चला तर मग जाणून घेऊयात की माता लक्ष्मीसाठी कोणत्या राशी जास्त प्रीय आहेत.

वृषभ राशी

वृषभ राशीचा ग्रह हा शुक्र आहे तर वृषभ राशी पृथ्वी तत्वाशी जोडली गेली आहे. या राशीचे लोक खूप शांत स्वभावाचे असतेत. ते आपलं काम खूप धैऱ्याने करणे पसंत करतात. वृषभ राशीचे लोक लवकर हार मानत नाहीत. ते सतत मेहनत करतात. यामुळेच त्यांना आयुष्यात हळू हळू मात्र शाश्वत यश मिळतं. मान्यतेनुसार माता लक्ष्मीची यांच्यावर कृपादृष्टी असते. त्यामुळे या राशीच्या लोकांना पैशाची चिंता भासत नाही.

कन्या राशी

कन्या राशी पृथ्वी तत्वाशी जोडली गेलेली राशी आहे. या राशीला राशीचक्रातील सहावी राशी मानलं गेलं जातं. या राशीचे लोक मेहनती आणि जबाबदारी घेणारे असतात. या राशीचे लोक आपलं काम हे खूप इमानदारीने करतात. त्याचे चांगले परिणाम त्यांना मिळत असतात. हे लोक टीममध्ये मिळून काम करण्यात चांगले असतात असं मानलं जातं. त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न असते आणि त्यांच्या मेहनतीचे फळ निश्चित त्यांना देत असते. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात धनप्राप्तीची कोणतीही कमतरता रहात नाही.

तूळ राशी

तूळ राशीचा स्वामी ग्रह हा शुक्र ग्रह आहे. ते वायू तत्वाशी जोडलेली राशी आहे. या राशीचे लोक समन्वय साधून पुढे जाण्यात माहीर असतात. त्यांचा व्यवहार हा चांगला असतो. हे लोक न्यायप्रीय आणि प्रत्येक गोष्ट हुशारीने सांभाळत असतात. हे लोक कला आणि क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत देखील समृद्ध असतात. सांगितलं जातं की लक्ष्मीच्या कृपेने त्यांना आयुष्यात अनेक संधी मिळतात. त्यांच्या आयुष्यात सतत सुख आणि सुविधा वाढत असतात.

कुंभ राशी

कुंभ रास ही वायू तत्त्वाशी संबंधित असून राशीचक्रात ११ व्या स्थानावर येते. या राशीचे लोक स्वतःच्या हिमतीवर प्रगती करण्यावर विश्वास ठेवतात. हे लोक अत्यंत कष्टाळू असण्यासोबतच समाजाप्रती आपली जबाबदारी देखील चोख पार पाडतात. त्यांचे विचार सखोल आणि समजूतदारपणाचे असतात. असे मानले जाते की, लक्ष्मी मातेच्या कृपेने त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळते आणि आयुष्यात पुढे जाण्याच्या अनेक संधी प्राप्त होत राहतात.

मीन राशी

मीन राशीचा संबंध जल तत्त्वाशी असून या राशीचा स्वामी 'बृहस्पति' (गुरु) मानला जातो. या राशीचे लोक मनाचे अत्यंत निर्मळ आणि भावूक असतात. इतरांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात आणि सतत सकारात्मक विचार करतात. त्यांच्याकडे सर्जनशीलता (Creativity) भरपूर असते. अशी मान्यता आहे की, त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे लक्ष्मी माता त्यांच्यावर प्रसन्न असते आणि त्यांना जीवनात सुख-समृद्धी लाभते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT