April Rashifal 2026 | एप्रिल महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन, 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस

April Rashifal 2026 | सूर्य, बुध, शुक्र, चंद्र आणि मंगळाच्या चालीमुळे होणार मोठा फायदा!
April Rashifal 2026
प्रातिनिधिक फोटो.file photo.
Published on
Updated on
Summary

ग्रहबदलांमुळे एप्रिल महिन्यात बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग आणि मंगलादित्य राजयोग निर्माण होणार आहेत. या राजयोगांमुळे काही राशींचे भाग्य उजळणार आहे.

April Rashifal 2026

मुंबई : अवघ्या काही तासांमध्‍ये एप्रिल महिन्‍यास प्रारंभ होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने एप्रिल महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन (गोचर) होणार आहे. एप्रिलमध्ये सूर्य, शुक्र, बुध, मंगळ आणि चंद्र आपल्या चालीत बदल करणार आहेत. या ५ ग्रहांचे गोचर काही राशींसाठी अत्यंत फलदायी मानले जात आहे.

एप्रिल महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे राशीपरिवर्तन

महिन्याच्या सुरुवातीलाच २ एप्रिल २०२६ रोजी मंगळ मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर ११ एप्रिल २०२६ रोजी बुध मीन राशीत प्रवेश करेल, तर ३० एप्रिल रोजी बुध मेष राशीत जाईल. धनसंपत्तीचा कारक शुक्र १९ एप्रिल रोजी वृषभ राशीत प्रवेश करेल. तसेच ग्रहांचा राजा सूर्य १४ एप्रिल रोजी मेष राशीत विराजमान होईल. या ग्रहबदलांमुळे एप्रिल महिन्यात बुधादित्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग आणि मंगलादित्य राजयोग निर्माण होणार आहेत.जाणून घेऊया या राजयोगांमुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे याविषयी...

April Rashifal 2026
वृश्चिक AI Photo

वृश्चिक राशीच्या जातकांना व्‍यवसायात मिळेल लाभ

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एप्रिलमधील ग्रहांचे गोचर फायदेशीर ठरणार आहे. काही जातकांना व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते. धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. करिअरच्या बाबतीत उत्कृष्ट ऑफर्स मिळतील. कार्यालयात वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील; संवाद साधल्यास कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकेल.

April Rashifal 2026
Shukra Gochar 2026 | शुक्राचे राशीपरिवर्तन कोणासाठी ठरेल लाभदायी? २६ मार्चपासून 'या' तीन राशींचे नशीब चमकणार!
Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष राशीच्‍या जातकांसाठी राजयोग उघडणार प्रगतीचे द्वार

मेष राशीच्या लोकांसाठी हा राजयोग प्रगतीचे द्वार उघडणारे ठरतील.करिअरशी संबंधित जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित होईल.व्यवसायानिमित्त काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता.आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल.कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. उत्‍पन्‍नाचे नवीन मार्ग किंवा कल्पना समोर येऊ शकतात.

April Rashifal 2026
Chandra Grahan 2026 : आज संध्याकाळी दिसणार ब्लड मून, 'या' ४ राशींवर पडणार सर्वाधिक प्रभाव
Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह राशीच्‍या जातकांना करिअरमध्‍ये उपलब्ध होतील नवीन संधी

सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना लाभदायी सिद्ध होऊ शकतो. व्यापार-उद्योगात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल, फक्त बोलण्यात गोडवा ठेवणे हिताचे ठरेल.करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. काही जातकांना नवीन नोकरी मिळू शकते.घरात सुख-शांतीचे वातावरण राहील आणि प्रियजनांसोबत आनंदात वेळ घालवाल.

टीप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news